लाइव्ह

Maharshtra Breaking News Live : ”मविआकडून वंचित बहुजन आघाडीचा अपमान”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लाइव्हब्लॉग बंद

  • 08:52 PM • 30 Jan 2024

    मोदींच्या कामावरच आम्ही मतदारांकडे जाणार-चंद्रशेखर बावनकुळे

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षात गरीबांच्या आणि देशाच्या कल्याणासाठी केलेल्या कामावरच आम्ही जनतेत जाणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, ज्यांच्याकडे कुणबी नोंदी असतील त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे. त्याच बरोबर मराठ्यांनाही आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
  • 08:17 PM • 30 Jan 2024

    शिवसेनेच्या पॅनकार्डचा ठाकरे गटाकडून गैरवापर-किरण पावसकरांचा गंभीर आरोप

    शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह आमच्याकडे असूनसुद्धा शिवसेनेच्या पॅनकार्ड आणि टॅन कार्डचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून गैरवापर सुरु असल्याचा आरोप शिवसेना आमदार किरण पावसकरांनी केला आहे.
  • 06:10 PM • 30 Jan 2024

    ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण

    मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे. चित्रपटसृष्टीला त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांना हा पुरस्कार दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
  • 05:24 PM • 30 Jan 2024

    मविआकडून वंचित बहुजन आघाडीचा अपमान

    महाविकास आघाडीच्या जागावाटपाची बैठक मुंबईतील ट्रायडेंड हॉटेलमध्ये पार पडली आहे. या बैठकीत पहिल्यांदाच वंचित आघाडी सामील झाली होती. वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी डॉ. पुंडकर यांनी बैठकीत आपला अजेंडा महाविकास आघाडीसमोर सादर केला. तेव्हा आम्ही चर्चा करून सांगतो असं म्हणून त्यांना 1 तास बैठकी बाहेर बसवून ठेवण्यात आले आणि आतमध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बैठक सुरु होती,असा आरोप धैर्यवर्धन पुंडकर यांनी केला आहे.
  • ADVERTISEMENT

  • 04:54 PM • 30 Jan 2024

    मंत्रिमंडळाची परवानगी न घेता हा जीआर काढला, मान तुटेपर्यंत सरकार का वाकले?- विरोधी पक्ष नेत्यांची टीका

    'सरकारने अध्यादेश काढला त्याचा परिणाम भविष्यात काय होणार यासाठी ओबीसी प्रमुख नेत्यांची बैठक झाली. ओबीसी समाज धास्तावला आहे. आमच्या हक्काचं संरक्षण होणार की नाही असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. मराठा समाजाचा सर्वे करुन अहवाल मागवला होता. कॅबिनेटपुढे हा निर्णय झाला नाही. मंत्रिमंडळाची परवानगी न घेता हा जीआर काढला, मान तुटेपर्यंत सरकार का वाकले हा प्रश्न आहे?' अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
  • 04:38 PM • 30 Jan 2024

    Marathi News Live Update : मोदींनी कॅलेंडर बदलून टाकले - सुषमा अंधारे

    'अयोध्येत राम मंदिर केले ही चांगली गोष्ट आहे. पण मोदींनी कॅलेंडर बदलून टाकले. निवडणुकीसाठी राम मंदिराचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी केला. राम नवमीला मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा केला नाही, कारण निवडणूक अगोदर आहे,' अशी टीका सुषमा अंधारेंनी केली.
  • ADVERTISEMENT

  • 02:20 PM • 30 Jan 2024

    ईडी कार्यालयात गेल्या दोन तासांपासून किशोरी पेडणेकर आणि संदीप राऊत यांची चौकशी सुरू

    मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि खासदार संदीप राऊत यांची दोन तासांपासून ईडी कार्यालयात चौकशी सुरु आहे. पेडणेकर यांच्यावर कथित बॉडी बॅग घोटाळ्याचा आरोप आहे, तर संदीप राऊत यांच्यावर कथित खिचडी घोटाळ्याचा आरोप आहे.
  • 01:30 PM • 30 Jan 2024

    Marathi News Live Update : संजय राऊतांवर रडण्याची वेळ आलीये- संजय शिरसाटांची टीका

    शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या संजय राऊतांवर टीका केली आहे . शिरसाट म्हणाले की, 'संजय राऊतांवर रडण्याची वेळ आलीये, विरोधक महिलांच्या जीवावर राजकारण करत आहेत'.
  • 01:27 PM • 30 Jan 2024

    Marathi News Live Update : मनोज जरांगेंची रायगडावर पायी यात्रा

    मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज रायगडावर पायी यात्रेसाठी निघाले आहेत. अनवाणी पायांनी ते आपल्या सहकाऱ्यांसह रायगड किल्ला सर करत आहेत. यावेळी ते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत.
  • 11:23 AM • 30 Jan 2024

    ईडी चौकशीपूर्वी किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?

    मी आयुक्तांना म्हणा किंवा कुणावरच दबाव टाकला नाही. असे दबाव टाकून जर काम करीत असतील.मग आता तर नगरसेवकच नाही, मग दबावात काम करतात की काय? म्हणूनच मुंबईची तिजोरी कोटीने खाली घसरत चालली आहे काय? की आयएएस ऑफिसर म्हणून सद्सदविवेक बुद्धीने काम करतायत,असे ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ईडी चौकशीआधी म्हणाल्या आहेत.
  • 11:01 AM • 30 Jan 2024

    Marathi News Live Update : कांद्याच्या भावात पुन्हा एकदा मोठी घसरण

    कांद्याचे भाव पुन्हा एकदा घसरले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बाजारात लाल कांद्याची मुबलक आवक झाल्याने कांद्याचे दर पडले आहेत. पुण्यातील मार्केट यार्ड मध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचा स्टॉक शिल्लक आहे. कांद्याची मोठी आवक आणि निर्यातबंदीमुळे कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात कांदा केवळ 20 रुपये किलोने मिळत आहे.
  • 10:49 AM • 30 Jan 2024

    Marathi News Live Update : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीत केंद्र पुरस्कृत महत्वाच्या योजना, प्रधानमंत्री आवास योजना (नागरी), आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, भारत नेट प्रकल्पाचा आढावा घेणार आहे.
  • 10:41 AM • 30 Jan 2024

    Marathi News Live Update : शिवीगाळ करणं आमदार रवींद्र धंगेकरांना भोवलं दाखल झाला गुन्हा

    पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करणं आमदार रवींद्र धंगेकर यांना भोवलं आहे. महापालिकेच्या अभियंता संघाच्या निषेधानंतर धंगेकर यांच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
  • 09:41 AM • 30 Jan 2024

    Marathi News Live Update : महाराष्ट्र सरकारने जातीनिहाय जनगणना करावी- खासदार उदयनराजे भोसलेंनी दिला इशारा

    'स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचे नाव घेऊन सत्ता भोगणाऱ्यांनी मराठा समाजाला सातत्याने आरक्षणापासून वंचित ठेवले. त्यामुळे व्यथित होऊन अनेक गरीब मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या ही वस्तुस्थिती आहे. बिहारमध्ये शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण शोधण्यासाठी जातीनिहाय जनगणना केली. परिणामी, सर्व घटकांना समान न्याय मिळाला. याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातीनिहाय जनगणना करावी,' असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
  • 09:38 AM • 30 Jan 2024

    Marathi News Live Update : प्रकाश आंबेडकर आज महाविकास आघाडीच्या बैठकीत राहणार हजर?

    आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये पार पडणार आहे. याबैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहणार नाहीत. पण, त्यांचे प्रतिनिधी उपस्थिती राहतील अशी माहिती सामच्या सूत्रांनी दिली आहे.
follow whatsapp

ADVERTISEMENT