Margaret Alva विरोधी पक्षाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार; शरद पवारांनी केली घोषणा
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जाहीर झाले आहेत. काल भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर आज विरोधी पक्षांनी आपला उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. विरोधी पक्षांनी मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांची उपराष्ट्रपतीपदाची उमेदवार म्हणून निवड केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा केली आहे. मार्गारेट अल्वा या […]
ADVERTISEMENT
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जाहीर झाले आहेत. काल भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर आज विरोधी पक्षांनी आपला उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. विरोधी पक्षांनी मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांची उपराष्ट्रपतीपदाची उमेदवार म्हणून निवड केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा केली आहे. मार्गारेट अल्वा या गोव्याच्या राज्यपाल होत्या. त्या मूळच्या कर्नाटक राज्यातील आहेत.
ADVERTISEMENT
उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची घोषणा शनिवारी संध्याकाळी एनडीएने केली. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. पीएम मोदींच्या उपस्थितीत झालेल्या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत धनखर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.
मार्गारेट अल्वा (Margaret Alva) कोण आहेत?
मार्गारेट अल्वा यांचा जन्म 14 एप्रिल 1942 रोजी कर्नाटकातील मंगलोर येथे झाला. त्यांनी कर्नाटकातच शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मार्गारेट काँग्रेसमध्ये गेल्या आणि काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर पाठवले. विविध मंत्रालयांच्या समित्यांमध्येही त्यांचा सहभाग होता. काँग्रेसने त्यांना 1975 मध्ये पक्षाचे सरचिटणीसही केले. अल्वा या एकूण चार वेळा राज्यसभेच्या सदस्य होत्या. त्यानंतर 1999 मध्ये त्या लोकसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या.
हे वाचलं का?
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६ ऑगस्ट रोजी मतदान
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार 19 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. 20 जुलै रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना 22 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. देशाचा पुढील उपराष्ट्रपती निवडण्यासाठी ६ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.
ADVERTISEMENT
उपराष्ट्रपती निवडीसाठी 6 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी मतमोजणीही होणार असून निवडणुकीचे निकालही लागणार आहेत. उपराष्ट्रपतीपदासाठीच्या उमेदवाराच्या नावावर सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांचे एकमत झाले तर मतदानाची गरज भासणार नाही. अशा स्थितीत उपराष्ट्रपतीही सर्वसहमतीने बिनविरोध निवडला जाऊ शकतो. मात्र, याची शक्यता कमीच दिसत आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की देशाचे विद्यमान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या चार दिवस आधी देशाचा पुढील उपराष्ट्रपती कोण असणार हे स्पष्ट होणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT