मातोश्रीचे दरवाजे ‘त्यांनीच’ बंद केले, संजय राऊत यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर
देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची घेतलेली भेट तीन दिवसांपासून चर्चेत आहे. याबाबत आज संजय राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले की फडणवीस आधी सिल्वर ओकवर गेले, त्यानंतर खडसेंच्या घरी गेले आता ते मातोश्रीवरही येतील असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. आता संजय राऊत यांना देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिलं आहे. मातोश्रीचे दरवाजे त्यांनीच आमच्यासाठी बंद […]
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची घेतलेली भेट तीन दिवसांपासून चर्चेत आहे. याबाबत आज संजय राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले की फडणवीस आधी सिल्वर ओकवर गेले, त्यानंतर खडसेंच्या घरी गेले आता ते मातोश्रीवरही येतील असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. आता संजय राऊत यांना देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिलं आहे. मातोश्रीचे दरवाजे त्यांनीच आमच्यासाठी बंद केले असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. नांदेडमध्ये त्यांनी हे उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
नांदेडमध्ये त्यांनी अशोक चव्हाण यांनाही टोला लगावला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामांची नुसती स्तुती करू नका तुम्हीही तशी कामं करून दाखवा म्हणजे लोक तुमचीही तशी स्तुती करतील असं म्हणत फडणवीस यांनी अशोक चव्हाणांनाही उत्तर दिलं आहे. गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त अशोक चव्हाण यांनी गडकरींच्या कामाची स्तुती करणारा लेख एका वृत्तपत्रात लिहिला होता त्यावर फडणवीस यांनी हा टोला लगावलाय. आमच्या नेत्याचं काम हे सगळ्यांना आवडतं हे आमच्यासाठी चांगलंच आहे. आम्हाला आनंदच आहे पण त्यांच्यासारखं काम तुम्ही केलंत तर तुमचीही स्तुती लोक करतील असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय काय? आता एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला
हे वाचलं का?
मागचे दोन दिवस काय घडलं?
सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट सदिच्छा भेट होती म्हणून सांगितलं असलं तरी या भेटीची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगली होती. देवेंद्र फडणवीस यांनी ही भेट डॅमेज कंट्रोलसाठी घेतली असावी अशीही चर्चा झाली. मात्र तसं काहीही नाही उलट डॅमेज कंट्रोलची गरज ही महाविकास आघाडी सरकारला आहे असंही उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. तर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावत उत्तम विरोधी पक्ष म्हणून कसं काम केलं पाहिजे याचं मार्गदर्शन शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना नक्कीच केलं असेल असं म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या वक्तव्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. संजय राऊत यांची अवस्था ना घर का ना घाटका अशी झाली आहे असंही फडणवीस म्हणाले.
ADVERTISEMENT
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सत्तेचा मंत्र दिला का? संजय राऊत यांनी दिलं उत्तर
ADVERTISEMENT
त्यानंतर आज संजय राऊत यांना पुन्हा एकदा प्रतिक्रिया विचारली गेली त्यावरही संजय राऊत म्हणाले की फडणवीस आधी सिल्वर ओकला गेले, त्यानंतर खडसेंच्या घरी गेले आता मातोश्रीवरही येतील. याबाबत आता देवेंद्र फडणवीस यांनीच उत्तर दिलं आहे. मातोश्रीचे दरवाजे आम्हाला त्यांनीच बंद केले आम्ही जाणं बंद केलं नव्हतं असं म्हणत फडणवीस यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT