Sharad Pawar आणि Prashant Kishor यांच्यात बंद दाराआड चर्चा, राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्यात थोड्याच वेळापूर्वी एक बैठक सुरु झाली असल्याची माहिती समोर आली आहे. साधारण 10 दिवसात या दोघांमधील ही दुसरी भेट आहे. मात्र आजची भेट ही राजधानी दिल्लीत (Delhi) होत आहे. दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या 6 जनपथ निवासस्थानी जाऊन प्रशांत […]
ADVERTISEMENT

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्यात थोड्याच वेळापूर्वी एक बैठक सुरु झाली असल्याची माहिती समोर आली आहे. साधारण 10 दिवसात या दोघांमधील ही दुसरी भेट आहे. मात्र आजची भेट ही राजधानी दिल्लीत (Delhi) होत आहे.
दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या 6 जनपथ निवासस्थानी जाऊन प्रशांत किशोर यांनी त्यांची भेट घेतली आहे. याआधी 11 जून रोजी मुंबईत येऊन प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची भेट घेतली होती.
यावेळी त्यांनी माध्यमांना असं सांगितलं होतं की, ही भेट फक्त सदिच्छा भेट आहे. सुप्रिया सुळेंनी मला जेवणासाठी निमंत्रण दिलं होतं. म्हणून मी इथे आलो आहे.
मात्र आता, पुन्हा एकदा प्रशांत किशोर यांनी पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.