मेहुल चोक्सीला भारतात आणण्याची तयारी सुरु, मराठमोळ्या IPS अधिकारी शारदा राऊत यांची टीम डोमनिकात दाखल
पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. काही दिवसांपूर्वी डोमनिकामध्ये चोक्सीला अटक करण्यात आली. भारतात आर्थिक घोटाळा करुन फरार झालेला चोक्सी अँटीग्वात राहत होता. अँटीग्वामधून आपल्या गर्लफ्रेंडसोबत डोमनिकामध्ये ट्रिपवर गेला असता त्याला अटक करण्यात आली. सध्या चोक्सीला भारतात पाठवण्याबद्दल डोमनिका कोर्टात एक अर्ज दाखल आहे. सीबीआय अधिकारी शारदा […]
ADVERTISEMENT

पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. काही दिवसांपूर्वी डोमनिकामध्ये चोक्सीला अटक करण्यात आली. भारतात आर्थिक घोटाळा करुन फरार झालेला चोक्सी अँटीग्वात राहत होता. अँटीग्वामधून आपल्या गर्लफ्रेंडसोबत डोमनिकामध्ये ट्रिपवर गेला असता त्याला अटक करण्यात आली. सध्या चोक्सीला भारतात पाठवण्याबद्दल डोमनिका कोर्टात एक अर्ज दाखल आहे. सीबीआय अधिकारी शारदा राऊत यांच्या नेतृत्वाखाली ६ अधिकाऱ्यांचं एक पथक सध्या डोमनिकामध्ये आहे.
गर्लफ्रेंडसोबत रोमँटीक ट्रीपवर गेला होता मेहुल चोक्सी, Dominica मध्ये झाली अटक – अँटीग्वा पंतप्रधानांची माहिती
डोमनिका कोर्टाने मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाला परवानगी दिली तर त्याला तात्काळ खासगी जेट विमानाने दिल्लीत आणलं जाईल. दिल्लीत आणल्यानंतर अटक करुन त्याच्यावर पुढील कारवाई सुरु होईल. डोमनिका कोर्टात चोक्सीला भारतात पाठवण्यासंदर्भातल्या अर्जावर सुनावणी होईल तेव्हा भारताची बाजू चांगल्या पद्धतीने मांडली जावी यासाठी भारतीय अधिकारी डोमनिका सरकारशी संपर्कात असल्याचं कळतंय.
EXCLUSIVE: असा दिसतो मेहुल चोक्सी, डोमिनिकाच्या जेलमधील फोटो आला समोर
याचाच एक भाग म्हणून ED डोमनिका कोर्टासमोर एक Affidavit सादर करणार असून ज्यात मेहुल चोक्सी हा भारतीय आहे, त्याने भारतात केलेला आर्थिक घोटाळ्याची माहिती आणि त्याला भारतात आणणं किती गरजेचं आहे याबद्दल माहिती दिलेली असणार आहे. डोमनिकामध्ये अटक करण्यात आलेल्या चोक्सीविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जाहीर केली आहे. २०१८ जानेवारीपासून चोक्सी फरार झाल्यामुळे त्याला भारतात आणणं गरजेचं असल्याचं भारतीय तपासयंत्रणा डोमनिका कोर्टासमोर मांडणार आहेत.
Mehul Choksi च्या मुंबईतल्या घराबाहेर नोटीसा आणि समन्सचा खच, 95 लाखांचा मेंटेनन्सही थकीत
२०१७ मध्या मेहुल चोक्सीला अँटीग्वाचं नागरिकत्व देण्यात आलं होतं. परंतू त्यासाठी चोक्सीने आपलं भारतीय नागरिकत्व सोडण्याची कोणतीही कागदोपत्री प्रक्रीया पूर्ण केली नाही. त्यामुळे चोक्सी हा अजुनही भारताचाच नागरिक आहे. त्यामुळे डोमनिका कोर्टासमोर भारतीय तपासयंत्रणांची बाजू बळकट व्हावी यासाठी सीबीआय, ईडी या यंत्रणा काम करत आहेत. डोमनिका कोर्टात मेहुल चोक्सीचं प्रत्यार्पण न्यायालयीन बाबींमध्ये अडकू नये यासाठी भारताचे प्रयत्न सुरु आहेत. असं झाल्यास भारताच्या हातात आलेली संधी निघून जाण्याची शक्यता आहे.