माझ्या पतीला टॉर्चर केलं गेलं; ते आत्महत्या करूच शकत नाहीत, बीडच्या 'त्या' जीएसटी अधिकाऱ्याच्या पत्नीचा खळबळजनक दावा

मुंबई तक

Beed Crime News : काही दिवसांपूर्वी बीड येथील सचिन जाधवर या जीएसटी अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे प्रकरण राज्यभर गाजले होते. त्यांच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकारी त्यांना त्रास देत असल्याचं नमूद केलं होतं. मात्र त्यांच्या पत्नीने वेगळाच दावा केला आहे. मयुरी जाधवर असं त्या अधिकाऱ्याच्या पत्नीचं नाव आहे.

ADVERTISEMENT

Beed Crime News
Beed Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

माझ्या पतीला टॉर्चर केलं गेलं, ते आत्महत्या करूच शकत नाहीत

point

मयत जीएसटी अधिकाऱ्याच्या पत्नीचा दावा

Beed Crime News, रोहिदास हातागळे, बीड : काही दिवसांपूर्वी बीड येथील सचिन जाधवर या जीएसटी अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे प्रकरण राज्यभर गाजले होते. त्यांच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकारी त्यांना त्रास देत असल्याचं नमूद केलं होतं. मात्र त्यांच्या पत्नीने वेगळाच दावा केला आहे. मयुरी जाधवर असं त्या अधिकाऱ्याच्या पत्नीचं नाव आहे. 'वरिष्ठ अधिकारी माझ्या पतीचा छळ करत होते. ते आत्महत्या करुच शकत नाहीत. यामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्याला शिक्षा व्हावी' अशी मागणी मयुरी जाधवर यांनी केली आहे. 

हे ही वाचा : रीलस्टारने सौंदर्याच्या जाळ्यात ओढून अनेकांना लुबाडले, पोलिसही झाले हनीट्रॅपची शिकार, पुरावे असूनही पोलिसांचे हात बांधलेलेच

मयुरी जाधवर यांनी काय आरोप केले?

मयुरी जाधवर यांनी पतीच्या आत्महत्येबद्दल शंका व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, 'आठ दिवसांपासून माझ्या पतीला मानसिक त्रास दिला जात होता. त्यांच्या गाडीमध्ये सुसाईड नोट असल्याचे सांगितले जाते, मात्र ती आम्हाला दाखवण्यात आलेली नाही.' यानंतर मयुरी यांनी मागणी केली की, 'ती सुसाईड नोट आम्हाला दाखवावी आणि समोर आलेल्या दोषी अधिकाऱ्याला थेट शिक्षा व्हावी.' तसेच माझे पती आत्महत्या करूच शकत नाहीत असा ठाम दावा करत त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली. माझी फिर्याद नोंदवून आरोपीला तात्काळ अटक करावी, अशीही मागणी त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात  बोलताना केली.

काय घडला होता प्रकार?

सहा दिवसापूर्वी बीड येथे राज्य कर अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सचिन जाधवर असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते दोन दिवसापासून बेपत्ता होते. या संदर्भात त्यांच्या पत्नीने बीड मधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली होती. सचिन जाधवर यांची कार सोलापूर-धुळे महामार्गालगत आढळून आली. त्या ठिकाणी पोलिसांनी पाहणी केली असता सचिन जाधवर हे कारमध्ये मृत अवस्थेत आढळून आले.  कारमध्ये कोयता आणि मडकं सापडलं आहे, त्यामुळे संशय बळावला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp