मुंबईची खबर: ठाणे ते CSMT प्रवास अधिक सुखकर होणार... 'या' नवीन पुलामुळे मुंबईकरांना मिळणार दिलासा!
शीव उड्डाणपुलाला समांतर पूल बांधला गेला तर ठाण्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसरात जाणाऱ्या गाड्यांना थेट पर्याय उपलब्ध होईल आणि त्यामुळे हा प्रवास आणखी सोपा होईल.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ठाणे ते CSMT प्रवास अधिक सुखकर होणार...
'या' नवीन पुलामुळे मुंबईकरांना मिळणार दिलासा!
Mumbai News: मुंबईकरांसाठी एक दिलासाजनक बातमी समोर आली आहे. गेल्या काही वर्षांपासून वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे सायन फ्लायओव्हर (Sion Flyover) परिसरात गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी पाहायला मिळत होती. अशातच, मुंबई महापालिकेच्या ब्रिज डिपार्टमेंटचा सायन उड्डाणपुलाला समांतर उड्डाणपूल बांधण्याचा विचार होता. VJTI च्या अहवालानंतर, या पुलाच्या कामासाठी लवकरच ऑर्डर्स दिले जातील. जर शीव उड्डाणपुलाला समांतर पूल बांधला गेला तर ठाण्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसरात जाणाऱ्या गाड्यांना थेट पर्याय उपलब्ध होईल आणि त्यामुळे हा प्रवास आणखी सोपा होईल.
शीव उड्डाणपुलाला समांतर फ्लायओव्हर
मुंबई महानगरपालिकेने पूर्व आणि पश्चिम टोकांना जोडणाऱ्या शीव उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू केलं आहे. तसेच, या पुलावर टू-प्लस-वन लेनची अरेन्जमेंट आहे. यामध्ये ठाणे आणि पूर्व उपनगरांकडे (उत्तरेकडे) जाणाऱ्या वाहनांसाठी दोन लेन आहेत आणि दक्षिण मुंबईतील सीएसएमटी (CSMT) कडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी एक लेन आहे. मागील काही वर्षांपासून या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या होती आणि ही समस्या सोडवण्यासाठी शीव उड्डाणपुलाला एक समांतर फ्लायओव्हर बनवण्याचा पर्याय समोर आला.
हे ही वाचा: Govt Job: भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरीची संधी! या पदांसाठी निघाली भरती... कधीपर्यंत कराल अर्ज?
मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिली माहिती
त्यानंतर, शीव उड्डाणपुलाला समांतर पूल बांधणे शक्य आहे का? याचा अभ्यास करण्याचं काम VJTI ला देण्यात आलं होतं. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी या प्रोजेक्टबाबत माहिती देताना सांगितलं की, व्हीजेटीआयने पूल बांधणं शक्य असल्याचा अहवाल दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आता ट्रॅफिक पोलिसांकडून नो-ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हे ही वाचा: अकोला: इंस्टाग्रामवर LIVE व्हिडीओ बनवत बाटलीतून विष प्राशन केलं अन्... 18 वर्षीय तरुणाने असं का केलं?
कसा असेल मार्ग?
मुंबई महानगरपालिकेकडून केशवराव खाडी मार्गाच्या पूर्वेकडील बाजूला महालक्ष्मी केबल-स्टेड फ्लायओव्हर बांधण्यात येत आहे. या फ्लायओव्हरचा एनएम जोशी मार्गापासून एस ब्रिज जंक्शनपर्यंत आणि हाजी अली जंक्शनपासून महालक्ष्मी रेसकोर्सपर्यंत विस्तार केला जाणार होता. या ब्रिजचं काम एका कॉन्ट्रॅक्टरला दिलं गेलं होतं. मात्र, ट्रॅफिक पोलिसांनी या प्रोजेक्टच्या कामासाठी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जारी केलं नाही आणि या जागेवर पुलाची गरज नसल्याचं स्पष्ट केलं. विस्ताराचं काम रद्द केल्यामुळे त्याच कॉन्ट्रॅक्टरला शीव फ्लाओव्हरला समांतर पूल बांधण्याचं काम दिलं जाणार आहे.










