Govt Job: भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरीची संधी! या पदांसाठी निघाली भरती... कधीपर्यंत कराल अर्ज?

मुंबई तक

भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) कडून असिस्टंट कोच पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत स्विमिंग, सायकलिंग, जूडो, शूटिंग, खो-खो अशा एकूण 26 खेळांमधील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

ADVERTISEMENT

भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरीची संधी!
भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरीची संधी!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरीची संधी!

point

या पदांसाठी निघाली भरती...

point

कधीपर्यंत कराल अर्ज?

Govt Job: क्रीडा क्षेत्रात करिअरची स्वप्नं पाहणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) कडून असिस्टंट कोच पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत स्विमिंग, सायकलिंग, जूडो, शूटिंग, खो-खो अशा एकूण 26 खेळांमधील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीचं अधिकृत नोटिफिकेशन जाहीर झालं आहे. 

या भरतीसाठी 1 फेब्रुवारी 2026 पासून उमेदवार ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतील. भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार sportsauthorityofindia.nic.in या 'स्पोर्ट्स ऑथरिटी ऑफ इंडिया'च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अप्लाय करू शकतात. 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. 

काय आहे पात्रता 

क्रीडा प्राधिकरणाच्या या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराकडे SAI NS-NIS, पटियाला किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोचिंगमध्ये डिप्लोमा किंवा समतुल्य डिग्री असणं आवश्यक आहे. किंवा ऑलिंपिक/ पॅरालिंपिक/ आशियाई खेळ/ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतील अनुभवासह सर्टिफिकेट कोचिंग कोर्स पूर्ण करणं गरजेचं आहे. तसेच, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त उमेदवार सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात. 

हे ही वाचा: अकोला: इंस्टाग्रामवर LIVE व्हिडीओ बनवत बाटलीतून विष प्राशन केलं अन्... 18 वर्षीय तरुणाने असं का केलं?

वयोमर्यादा 

भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांसाठी 30 वर्षे कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल. 

हे वाचलं का?

    follow whatsapp