“मी भाग्यवान आहे की….” शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलेलं असताना मिलिंद नार्वेकरांचं ट्विट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेत दोन गट पडले आहेत. ५६ वर्षांपासून एकसंध असलेली शिवसेना याच वर्षी २१ जूनला दुभंगली. शिवसेना एवढी दुभंगली की शिवसेनेत एक ठाकरे गट आणि दुसरा शिंदे गट असे दोन गट तयार झाले आहेत. एवढंच काय दसरा मेळावेही दोन होत आहेत. एक उद्धव ठाकरेंचा दुसरा एकनाथ शिंदेचा. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत उद्धव ठाकरेंनी जायला नको होतं हे म्हणत थेट पक्ष नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उभं करत एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. ज्याला एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार उठाव असं म्हणतात. अशात उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात जातील अशी चर्चा आहे. मिलिंद नार्वेकर यांनी मात्र एक ट्विट काही वेळापूर्वी केलं आहे त्यामुळे त्या ट्विटची चर्चा आता रंगली आहे.

ADVERTISEMENT

‘मिलिंद नार्वेकर नवे शिवसेनाप्रमुख’ नारायण राणेंचा टोला

काय आहे मिलिंद नार्वेकर यांनी केलेलं ट्विट?

मी भाग्यवान आहे की मला सरन्यायाधीश उदय लळीत, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, तिरूमला तिरूपती देवस्थानचे प्रमुख सुब्बा रेडी या सगळ्यांसह व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात जो ब्रह्मोत्सव सुरू आहे त्यातल्या पाचव्या दिवशी गरूड पूजेचा साक्षीदार होता आलं. या आशयाचं ट्विट आणि फोटो मिलिंद नार्वेकर यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

गुलाबराव पाटील यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

नुकतेच बाळासाहेब ठाकरेंसोबत सावलीसारखे वावरणारे थापा हे शिंदे गटात आले. मला एकनाथ शिंदे यांचे विचार पटल्याने मी त्यांच्यासोबत आल्याचंही थापा यांनी म्हटलं. चंपासिंह थापा यांचाच संदर्भ देत गुलाबराव पाटील म्हणाले की आमच्यावर आरोप करतात की आम्ही ५० खोके घेतले. बरं मग चंपासिंह थापा यांनी काय घेतलं? ज्या थापा यांनी संपूर्ण आयुष्य बाळासाहेब ठाकरेंच्या चरणी अर्पण केलं होतं, ज्या थापा यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या चितेला हात लावला होता ते थापाही सोडून आले. आता मिलिंद नार्वेकरही आमच्याकडे येत आहेत. असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

Milind Narvekar: हाती शिवबंधन नाही पण कट्टर शिवसैनिक, कोण आहेत मिलिंद नार्वेकर?

ADVERTISEMENT

कोण आहेत मिलिंद नार्वेकर?

मिलिंद नार्वेकर हे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. गटप्रमुख ते उद्धव ठाकरेंचे सचिव ते आता शिवसेना सचिव असा मिलिंद नार्वेकरांचा राजकीय प्रवास राहिला आहे. मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून गेल्याच वर्षी मिलिंद नार्वेकर यांची निवड झाली होती.

काही वर्षांपूर्वी मिलिंद नार्वेकर शाखाप्रमुखाच्या मुलाखतीसाठी गेले होते. त्यावेळी नार्वेकर यांचा संवाद साधण्याची शैली, हुशारी पाहून उद्धव ठाकरेंनी त्यांची आपल्या स्वीय सचिव पदावर नेमणूक केली. यानंतर नार्वेकर अद्यापही उद्धव ठाकरेंचा राईट हँड ही आपली भूमिका नेमाने बजावत आहेत. आता हे मिलिंद नार्वेकर जर शिंदे गटात गेले तर तो सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरेंसाठी असणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलिंद नार्वेकरांबाबत काय म्हटलं आहे?

मिलिंद नार्वेकर येत आहेत की नाही मला माहित नाही. मी मुख्यमंत्री आहे मला अनेक लोक भेटायला येत नाही. मी लपवून काहीही ठेवत नाही माझं सगळं पारदर्शक आहे. पोटात एक ओठात एक असं माझं काही नसतं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. मात्र मिलिंद नार्वेकर हे जर शिंदे गटात गेले तर सर्वात मोठा धक्का हा उद्धव ठाकरेंना बसणार यात काहीही शंका नाही. आता दसरा मेळाव्यात हा प्रवेश होतो का? हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. अशात सोशल मीडियावर मिलिंद नार्वेकरांनी केलेल्या ट्विटची चर्चा रंगली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT