Chandrakant Patil: “माझ्यावर झालेली शाईफेक हा भ्याडपणा, हिंमत असेल तर…”
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवत पुण्यातल्या पिंपरीमध्ये त्यांच्यावर एका अज्ञाताने शाईफेक केली. हा समता परिषदेचा कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात येतं आहे. या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हटलं आहे चंद्रकांत पाटील यांनी? माझ्यावर झालेली शाईफेक हा भ्याडपणा आहे. मी माझं पोलीस […]
ADVERTISEMENT
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवत पुण्यातल्या पिंपरीमध्ये त्यांच्यावर एका अज्ञाताने शाईफेक केली. हा समता परिषदेचा कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात येतं आहे. या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे चंद्रकांत पाटील यांनी?
माझ्यावर झालेली शाईफेक हा भ्याडपणा आहे. मी माझं पोलीस संरक्षण काढून कार्यक्रमाला जाय़ला तयार आहे हिंमत असेल तर समोर या असं आव्हानच चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचा कार्यक्रम होता. त्यासाठी चंद्रकांत पाटील हे आले आहेत. त्यावेळी त्यांच्यावर अज्ञातांकडून शाईफेक करण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं, त्यानंतर त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. तरीही हा शाईफेकीचा प्रकार पिंपरीत घडला.
मी रडणारा नाही तर लढणारा माणूस आहे
तुम्ही रडता आहात का? असं विचारल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले मी रडणारा माणूस नाही. माझ्या डोळ्यांची मला काळजी असल्याने मी ड्रॉप टाकले त्यामुळे तुम्हाला तसं वाटू शकतं पण मी लढणारा आहे. जो प्रकार घडला त्याला जशास तसं म्हणजे मारामाऱ्या करून नाही. आता राष्ट्रवादीने, उद्धव ठाकरेंनी, अजित पवार यांनी या झुंडशाहीबाबत बोलावं ना. असं आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
हे वाचलं का?
कुठल्याही पोलिसाचं निलंबन करू नका अशी माझी विनंती आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करतो की जे घडलं की त्यामुळे कुणाचंही निलंबन करू नका. कार्यकर्त्यांनाही मी शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. कायदा हातात घेऊ नका हे मी सगळ्यांना सांगितलं आहे. मी इतर कुणाच्या कार्यकर्त्यांना काही सांगणार नाही. मी फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगतो आहे. हिंमत असेल तर ज्यांनी या लोकांन पाठवलं त्यांनी समोर यावं असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. कुठल्याही पोलिसांवर कारवाई करू नये अशी माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो आहे.
पुण्यात चंद्रकांत पाटील यांचा निषेध
भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी, औरंगाबाद येथे एका कार्यक्रमा दरम्यान कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडरकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनी शाळा सुरु केल्या.शाळा सुरु करताना त्यांना सरकारने अनुदान दिलं नाही.तर त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती. आता १० कोटी रुपये देणारे लोक आहेत. असे विधान केल्यानंतर राज्यातील विविध राजकीय पक्षातील नेते आणि संघटनांचे प्रतिनिधी आक्रमक झाले असून आज पुण्यातील कोथरूड येथील चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिससमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT