धक्कादायक! ८० जणांनी ८ महिने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार,घटना वाचून तुमचा थरकाप उडेल

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

एका अल्पवयीन मुलीवर ८० जणांनी ८ महिने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अल्पवयीन मुलीला बळजबरीने वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलं १९ एप्रिलला या मुलीची सुटका करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

ADVERTISEMENT

आंध्र प्रदेशातल्या गुंटूरमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या धक्कादायक घटनेतील सवर्ण कुमारीचा शोध पोलिसांनी लावला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जून २०२१ मध्ये कोव्हिडचा फैलाव वाढत असतानाच आरोपी सवर्ण कुमारीची भेट पीडित मुलीच्या आईशी झाली. पीडितेच्या आईला कोरोना झाला होता. ज्यात तिचा मृत्यू झाला.

हे वाचलं का?

यानंतर सवर्ण कुमारीने या मुलीला दत्तक घेतलं आणि तिला वेश्या व्यवसायात ढकललं.ऑगस्ट २०२१ या मुलीच्या वडिलांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. याच आधारावर पोलिसांनी मुख्य आरोपी महिला सवर्ण कुमारी हीची ओळख पटवली. या प्रकरणातली पहिली अटक जानेवारी महिन्यात झाली होती. मंगळवारी १९ एप्रिलला गुंटूर पश्चिम क्षेत्रात पोलिसांनी एका विद्यार्थ्यासहीत आणखी १० जणांना अटक केली. आरोपी आणि पीडित मुलगी या दोघींचीही चौकशी केल्यानंतर पोलिसांना या घटनेमागचं धक्कादायक वास्तव समोर आलं.

पुण्यात संतापजनक घटना! १२ वर्षीय मुलीवर ३५ वर्षीय नराधमाने केला बलात्कार

ADVERTISEMENT

पोलिसांचं म्हणणं आहे की या प्रकरणी येत्या काळात आणखी इतर लोकांनाही अटक करण्याची कारवाई केली जाईल. हे प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेतलं आहे. यातला एक आरोपी लंडनमध्ये आहे. या प्रकरणी पोलिसांनी एक कार, ५३ मोबाईल, तीन रिक्षा आणि तीन बाईक हे सगळं जप्त केलं आहे. या प्रकरणातल्या एकाही आरोपीला सोडणार नाही असंही पोलिसांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

पोलिसांना पीडित अल्पवयीन मुलीने सांगितलं की आठ महिन्यांपासून तिच्यावर ८० जणांनी बलात्कार केला. या मुलीला देहविक्रीसाठी आंध्रप्रदेश, तेलंगण या ठिकाणी असलेल्या वेश्यागृहांमध्ये पाठवण्यात आलं होतं. या मुलीला जबरदस्तीने देहविक्रीच्या व्यवसायात ढकलल्याने सवर्ण कुमारी या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT