Gopichand Padalkar यांच्या भावाला मिरज तहसिलदारांचा दणका
(Gopichand Padalkar brother bramhanand Padlakar news) सांगली : भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkr) आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर (Brmhanand Padalkar) यांना मिरज (Miraj) तहसीलदार दगडू कुंभार यांनी दणका दिला आहे. मिरजमधील वादग्रस्त जागेवर संबंधित मिळकतदारांचा हक्क तहसिलदारांनी मान्य केला आहे. तसेच ब्रम्हानंद पडळकर यांना या निकालाबाबत न्यायालयामध्ये दाद मागण्याचीही मुभा […]
ADVERTISEMENT
(Gopichand Padalkar brother bramhanand Padlakar news)
ADVERTISEMENT
सांगली : भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkr) आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर (Brmhanand Padalkar) यांना मिरज (Miraj) तहसीलदार दगडू कुंभार यांनी दणका दिला आहे. मिरजमधील वादग्रस्त जागेवर संबंधित मिळकतदारांचा हक्क तहसिलदारांनी मान्य केला आहे. तसेच ब्रम्हानंद पडळकर यांना या निकालाबाबत न्यायालयामध्ये दाद मागण्याचीही मुभा देण्यात आलेली आहे. (Gopichand Padalkar brother bramhanand Padlakar news)
७ जानेवारीला मध्यरात्री मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील दुकाने, हॉटेल जेसीबीच्या साह्याने पाडले आणि बेकायदेशीरपणे या जागेचा ताबा घेण्याच्या प्रयत्न केला असा आरोप ब्रह्मानंद पडळकर यांच्यावर करण्यात आला आहे. या पाडकामात त्यांनी जवळपास १० आस्थापनांचं नुकसान केलं होतं. या प्रकरणात ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह १०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे वाचलं का?
त्यानंतर या प्रकरणात तहसिलदारांपुढेही सुनावणी सुरु होती. अखेर आज तहसिलदार दगडू कुंभार यांनी या प्रकरणात मिळकतदारांच्या बाजूने निकाल दिला आहे. या जागेवर संबंधित मिळकतदारांचाच कब्जा असल्याचा निकाल तहसिलदारांनी दिला आहे. तसेच ब्रम्हानंद पडळकर यांना या निकालाबाबत न्यायालयामध्ये दाद मागण्याची मुभा देण्यात आलेली आहे.
ADVERTISEMENT
भाजपने पडळकर बंधूंना फटकारलं होतं :
या प्रकारानंतर शहरात रातोरात केलेली पाडापाडीची कृती चुकीचीच होती. सत्तेचा गैरवापर करणाऱ्या कोणालाही भाजप पाठीशी घालत नाही. पक्षश्रेष्ठी याबाबत योग्य तो निर्णय घेतील, अशा शब्दात भाजप नेते आणि सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी भाजप नेते, जिल्हा परिषद सदस्य ब्रम्हानंद पडळकर यांना फटकारलं होतं.
ADVERTISEMENT
पडळकर यांनी मिरजेत केलेली कृती योग्य नाही. ती दुर्दैवी स्वरूपाची आहे. सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना भाजप कधीही पाठीशी घालत नाही आणि घालणार नाही. पक्षश्रेष्ठी याबाबत योग्य तो निर्णय घेतील. तसंच या पाडापाडी बाबत पोलीसही योग्य कारवाई करतील, असं आश्वासन देखील पालकमंत्री खाडे यांनी यावेळी दिले. शिवाय जागेचा ताबा हा कायदेशीर मार्गानेही घेता आला असता, मात्र दुर्देवी स्वरुपाची कृती झाली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT