Miss World 2021 स्पर्धा पुढे ढकलली, भारताच्या मानसा वाराणसीसह 17 जणांना कोरोनाची लागण
ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. त्यातच आता कोरोनाचा शिरकाव मिस वर्ल्ड स्पर्धेतही झाला आहे. मिस वर्ल्ड 2021 मधील स्पर्धक आणि भारतीय मॉडेल मानसा वाराणसी हिला कोरोना संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. तिच्याशिवाय आणखी 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. अशा परिस्थितीत सुरक्षेचा विचार […]
ADVERTISEMENT
ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. त्यातच आता कोरोनाचा शिरकाव मिस वर्ल्ड स्पर्धेतही झाला आहे. मिस वर्ल्ड 2021 मधील स्पर्धक आणि भारतीय मॉडेल मानसा वाराणसी हिला कोरोना संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. तिच्याशिवाय आणखी 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. अशा परिस्थितीत सुरक्षेचा विचार करून मिस वर्ल्ड 2021 स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
मानसासह 17 जणांना कोरोनाची लागण
गुरुवारी हा इव्हेंट सुरू होण्याच्या काही तास आधी याबाबतची घोषणा करण्यात आली. मिस वर्ल्ड 2021 ही स्पर्धा दक्षिण अमेरिकेत सुरु आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या स्पर्धकांना द. अमेरिकेच्या Puerto Rico मध्ये आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. इथेच या स्पर्धेचा फिनालेही होणार होता.
हे वाचलं का?
मात्र, आता ग्रँड फिनालेचा संपूर्ण कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून त्याचं नवं वेळापत्रक तयार केलं जाईल. ही स्पर्धा पुढील 90 दिवसात पुन्हा आयोजित केली जाईलं असं मिस वर्ल्ड स्पर्धा आयोजित करणाऱ्या संघटनेने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘स्पर्धकांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात घेऊन मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनने मिस वर्ल्ड फिनाले पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.’
Miss Universe 2021: मिस युनिव्हर्सला बक्षिसात नेमकं काय-काय मिळतं?
ADVERTISEMENT
17 स्पर्धक आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. कोरोनाने संक्रमित झालेल्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी मानसा वाराणसी हिचा देखील समावेश आहे. मानसाने या स्पर्धेत सहभागी होण्याआधी मिस इंडिया वर्ल्ड 2020 चा हा किताब पटकावला होता.
ADVERTISEMENT
मिस इंडिया ऑर्गनायझेशनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर म्हटलं आहे की, ‘आम्हाला विश्वास बसत नाही की, तिच्या (मानसा वाराणसी) अथक परिश्रम आणि समर्पणानंतरही ती जागतिक मंचावर चमकू शकणार नाही. मात्र तिची सुरक्षा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.’
मिस वर्ल्ड स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर अनेक स्पर्धकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. मात्र, आता याबाबत अशीही माहिती मिळते आहे की, आरोग्य अधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर स्पर्धकांना घरी जाण्याची परवानगी दिली जाईल.
Omicron: ब्रिटनमध्ये एका दिवसात कोरोनाचे 88 हजारांहून अधिक नवे रुग्ण; भारतातही Omicron रुग्णांमध्ये वाढ
काही दिवसांपूर्वीच भारताच्या हरनाज संधू हिने मिस युनिव्हर्स 2021 चा किताब जिंकल्यानंतर आता सर्वांच्या नजरा या मिस वर्ल्ड 2021 वर लागल्या होत्या. मानसा वाराणसी ही मिस वर्ल्ड 2021 स्पर्धेत विजेतेपद पटकावून भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवणार का याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र, कोरोनाचा शिरकाव झाल्याने ही स्पर्धा तूर्तास स्थगित करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT