Dhananjay Munde : नेपाळमध्ये लुटलं; ८ जणांसाठी धनंजय मुंडे ठरले देवदूत!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra | Dhananjay Munde News :

ADVERTISEMENT

बीड : नेपाळमध्ये फिरायला गेल्यानंतर लुटमार झाल्यानं अडकून पडलेल्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील ८ युवकांना आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि राज्य सरकारच्या (Maharashtra Government) प्रयत्नांमुळे परतीचं तिकिट मिळालं आहे. हे आठही युवक सुखरुप असून ते लवकरच आपापल्या घरी पोहोचतील, असं सांगण्यात येत आहे. यासाठी बीड पोलीस प्रशासनापासून ते नेपाळमधील भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यापर्यंत सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर प्रयत्न केल्याची माहिती आहे. (After going for tourism in Nepal, 8 youths were trapped due to robbery)

याबाबत अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील शिरूर घाट येथील दीपक जीवन सांगळे, महेश हरकर, विश्वजीत घुले, किरण चव्हाण, आकाश खामकर, अक्षय पारेकर, अविष्कार मुळीक आणि सुरज लोंढे हे आठ तरुण फिरायला नेपाळमध्ये गेले होते. मंगळवारी (३१ जानेवारी) रात्री काठमांडू शहरातील तामिल परिसरात फिरत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील सर्व पैसे तसंच त्यांच्या अकाउंटवरील पैसे सुद्धा जबरदस्तीने ऑनलाइन ट्रान्सफर करुन घेतले.

हे वाचलं का?

Crime : शेतकरी महिलेची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे; ओलांडली क्रूरतेची सीमा!

दरम्यान, या घटनेमुळे घाबरलेले आठही तरुण जवळच्या पोलीस ठाण्यात गेले, मात्र तिथे त्यांना अपेक्षित मदत मिळाली नाही. त्यानंतर या तरुणांनी पोलीस ठाण्यातील वायफायचा वापर करुन धनंजय मुंडे यांना व्हॉट्सअप कॉल केला आणि मदतीची याचना केली. मुंडे यांनी संबंधित तरुणांना धीर दिला तसेच तात्काळ मदतीचे आश्वासन दिले.

ADVERTISEMENT

त्यानंतर अपघातग्रस्त असूनही धनंजय मुंडे यांनी ट्विट करत परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर, नेपाळमधील भारतीय दूतावास, नेपाळ पोलीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार आदींना याबाबत माहिती दिली. फोनवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांच्या कार्यालयासही सदर तरुणांना मदत करण्याबाबत विनंती केली. बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनाही याबाबत माहिती देत मुलांच्या सुटकेसाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही क्षणातच यंत्रणा कामाला लागल्या.

ADVERTISEMENT

NCP ची ताकद कायम ठेवण्यासाठी पवार मैदानात; लोकसभा अध्यक्षांसोबत खलबतं

नेपाळमधील भारतीय दूतावास आणि गृह विभागाच्या कर्मचाऱ्यांनी थेट संबंधित पोलीस ठाणे गाठून तरुणांशी संपर्क साधला व त्या तरुणांच्या जीवात जीव आला. दरम्यान या तरुणांची लूट करणाऱ्या दोन चोरट्यांना नेपाळ पोलिसांनी अटक केली असून, सर्व ८ तरुण सध्या सुखरूप आहेत आणिभारतीय शासकीय यंत्रणेमार्फत त्यांची तामील (काठमांडू) येथील अग्रवाल भवन येथे राहणे आणि अन्य व्यवस्था करण्यात आली आहे. या तरुणांना परत येण्यासाठी तिकिटासह सर्व व्यवस्था करण्यात आली असुन लवकरच सर्वजण भारतात आपापल्या घरी सुखरूप पोचतील, असं सांगितलं जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT