भाजप आमदार नितेश राणेंना दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याची राज्य सरकारची ग्वाही

विद्या

भाजपचे आमदार नितेश राणे गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणी नितेश राणे यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर नितेश राणे यांनी अटक पूर्व जामीनासाठी सिंधुदुर्गातील न्यायालयात अर्ज केला होता. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भाजपचे आमदार नितेश राणे गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणी नितेश राणे यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर नितेश राणे यांनी अटक पूर्व जामीनासाठी सिंधुदुर्गातील न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नितेश राणे यांच्या या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली.

नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यातला संघर्ष
नेमका कधी आणि कसा सुरू झाला?

काय म्हटलं आहे महाराष्ट्र सरकारने कोर्टात?

खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात आमदार नितेश राणेंवर कोणतीही जबरदस्तीची कारवाई करणार नाही. महाराष्ट्र सरकारने हे कोर्टात सांगितलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खुनाच्या प्रयत्नाचं हे प्रकरण आहे. विशेष सरकारी वकील सुदीप पासबोला म्हणाले की नितेश राणे या प्रकरणात सहआरोपी आहोत याबद्दल तपशीलवार प्रतिज्ञापत्र आम्ही दाखल करणार आहोत. ते या घटनेचे मास्टरमाईंड कसे आहेत ते आम्ही दाखवून देऊ.

हे वाचलं का?

    follow whatsapp