MNS Anniversary: राज ठाकरे म्हणाले, ‘आपण सत्तेत असणार म्हणजे असणार..’
Raj Thackeray Thane Speech: ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या (MNS) 17 व्या वर्धापन दिनानिमित्त ठाण्यात (Thane) एक सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या ठाकरी शैलीत कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला. यावेळी राज ठाकरेंनी फारसं राजकीय भाष्य केलं नाही.. कारण आपण त्यावर 22 मार्च रोजी म्हणजेच पाडवा मेळाव्याला बोलणार […]
ADVERTISEMENT
Raj Thackeray Thane Speech: ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या (MNS) 17 व्या वर्धापन दिनानिमित्त ठाण्यात (Thane) एक सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या ठाकरी शैलीत कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला. यावेळी राज ठाकरेंनी फारसं राजकीय भाष्य केलं नाही.. कारण आपण त्यावर 22 मार्च रोजी म्हणजेच पाडवा मेळाव्याला बोलणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र यावेळी राज ठाकरे असंही म्हणाले की, आगामी महापालिका निवडणुका झाल्यास मनसे ही सत्तेत असेल. (mns anniversary raj thackeray said dont worry we are come to power in the municipalities)
ADVERTISEMENT
पाहा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले:
असं वाटतंय.. दहावीला नापास झालोय!
‘एक मी तुम्हाला खरंच सांगतोय.. की, आपण सत्तेपासून दूर नाहीत. हे मळभ दूर होईल. मी उगाच तुम्हाला आशा दाखवत नाही. मला माहितेय ते. पुढे देखील आपल्याला काम करायचं आहे. या सगळ्या महानगरपालिका जिंकायच्या आहेत. कळत नाही महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार आहेत. गेली दोन वर्ष दहावीला नापास झाल्यासारखंच वाटतंय.’
हे वाचलं का?
‘काय वाटतंय निवडणुकीचं काय वाटतंय… मार्च.. मार्च जवळ आलं की, काय वाटतंय काय निवडणुकीचं.. ऑक्टोबर.. बहुदा मार्च.. साला दहावीला नापास झालो की काय असं वाटतं दोन वर्ष..’ अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरेंनी आपल्या भाषणात केली.
‘आपण महानगरपालिकेत सत्तेत असणार म्हणजे असणार..’
ADVERTISEMENT
‘पण जेव्हा कधी निवडणुका होऊ देत महानगरपालिकेच्या.. आपण महानगरपालिकेत सत्तेत असणार म्हणजे असणार.. ही जनता या सगळ्या लोकांना विटलेली आहे. यांचे जे काही तमाशे दररोज सुरू आहेत ना.. त्या सगळ्याला जनता विटली आहे. आपण फक्त त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. मी भाषणं तर देईनच.. पण तुम्हाला लोकांच्या घरापर्यंत जावं लागेल. आपण सत्तेपासून दूर राहणार नाही. ती जी गोष्ट आणायची आहे..’ असा विश्वास राज ठाकरेंनी आपल्या मनसैनिकांना दिला.
ADVERTISEMENT
Raj Thackeray : ‘भाजपने लक्षात ठेवावं, आज भरती, उद्या ओहोटी येणारच!’
‘महाराष्ट्रात इतकं गलिच्छ राजकारण मी आजवर कधीही पाहिलं नाही’
‘राजकारणाची जेव्हा मला समज आली.. तेव्हापासून आजपर्यंत मी असा महाराष्ट्र मी कधी बघितला नाही.. इतकं गलिच्छ राजकारण, घाण राजकारण.. एवढ्या खालच्या स्तराची भाषा.. कधी आजपर्यंत मी पाहिली नाही. ज्या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं.. तो महाराष्ट्र हा.. टीव्हीवर पाहवत नाही आपली लोकं.. किती खालच्या थराला जाऊन बोलायचं.. काही मर्यादाच उरलेल्या नाहीत.’ अस म्हणत राज ठाकरेंनी राज्यातील राजकारणावर जोरदा टीका केली.
MNS वर्धापनदिन : राज ठाकरे काय म्हणाले?
दरम्यान, आजच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी शिवसेना, भाजप किंवा इतर पक्षांबाबत फारसं काही भाष्य केलं नाही. मात्र, पाडव्याच्या सभेत राज्यातील सगळ्या राजकारणावर बोलणार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यामुळे आता 22 तारखेला राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
MNS: ‘आमदार राजू पाटलांनी मनसेवर दावा केला तर?’, राज ठाकरे म्हणाले..
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT