Raj Thackeray: राज ठाकरे प्रचंड संतापले, मनसे नेत्यांना दमच भरला; म्हणाले…
Raj Thackeray Letter to MNS Leaders: मुंबई: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक पत्रक जारी करुन आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांना सज्जड दम भरला आहे. थेट माध्यमांशी (Media) किंवा सोशल मीडियामध्ये (Social Media) जाऊन बोलाल तर थेट पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल असा सज्जड दमच भरला. राज ठाकरे यांनी आपलं पत्रक सोशल मीडियावर देखील शेअर […]
ADVERTISEMENT
Raj Thackeray Letter to MNS Leaders: मुंबई: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक पत्रक जारी करुन आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांना सज्जड दम भरला आहे. थेट माध्यमांशी (Media) किंवा सोशल मीडियामध्ये (Social Media) जाऊन बोलाल तर थेट पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल असा सज्जड दमच भरला. राज ठाकरे यांनी आपलं पत्रक सोशल मीडियावर देखील शेअर केलं आहे. त्यामुळे मनसेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. (mns chief raj thackeray has banned its leaders from speaking directly to media on internal party matters)
ADVERTISEMENT
राज ठाकरे हे आपल्या कठोर कृतीसाठी ओळखले जातात. पक्षातील नेत्यांनी चुका केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यास राज ठाकरे अजिबात मागे पुढे पाहत नाही. त्यामुळे राज ठाकरेंनी आता जे पत्रक जारी केलं आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज ठाकरे प्रचंड संतापले… सिंधुदुर्गात असं काय घडलं?
हे वाचलं का?
पाहा राज ठाकरेंनी आपल्या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे:
‘सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाट्टेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स ह्याच्याने हे सगळे शेफारले आहेत. इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खपवून घेणार नाही.’
ADVERTISEMENT
‘माझ्या पक्षातल्या कोणालाही, पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्यांशी बोला, माझ्याशी बोला. पण हे सोडून जर थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची आहे ती करा. पक्षात राहून असे प्रकार केलेत, तर हकालपट्टी अटळ आहे हे लक्षात ठेवा.’
ADVERTISEMENT
ही समज नाही तर अंतिम ताकीद आहे ह्याची नोंद घ्या!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील प्रत्येकाने पक्षशिस्त पाळायलाच हवी ! pic.twitter.com/42cuKigAWk
— Raj Thackeray (@RajThackeray) December 21, 2022
असा सज्जड दम भरणारं पत्रच राज ठाकरे यांनी जारी केलं आहे. राज ठाकरेंच्या या पत्रानंतर मनसेतील कार्यकर्ते कशा पद्धतीने आपल्या भावना मांडणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
‘घ्यायचा तर घ्या, नाहीतर सोडून द्या’, फडणवीसांना पत्र लिहिण्याचं राज ठाकरेंनीच सांगितलं कारण
राज ठाकरेंचा नेमका रोख कोणाकडे?
मनसेतील बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे राज ठाकरे यांचे सर्वात जवळचे नेते आहेत. हे दोन्ही नेते कायमच माध्यमांशी अतिशय संयमाने आणि कमीच बोलतात. पण त्यांच्या व्यतिरिक्त मनसेतील काही पदाधिकारी गेल्या काही महिन्यांपासून सलग माध्यमांसमोर येऊन आपली मतं मांडत आहेत. हीच गोष्ट राज ठाकरेंना यांना खुपल्याने आता त्यांना समज देण्यासाठी राज ठाकरेंनी थेट पत्रकच जारी केलं आहे.
राज ठाकरेंच्या या पत्रकांचा संबधित नेत्यांवर काही परिणाम होणार की, ते मीडियासमोर येतच राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT