मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा नितीन गडकरींना फोन! म्हणाले, “आपण जनतेला…”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना फोन केला होता. मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलं आहे त्याबाबत फोनवरून आपण नितीन गडकरींशी संवाद साधला त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही संवाद साधला असंही राज ठाकरे यांनी माध्यमांना सांगितलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोकण दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी पक्ष संघटना बांधण्यासोबतच कोकणातल्या समस्याही जाणून घेतल्या.

ADVERTISEMENT

मुंबई गोवा महामार्गाबाबत काय म्हणाले राज ठाकरे?

नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्ग जर अल्पावधीत बांधून तयार होत असेल तर मग मुंबई ते गोवा या महामार्गाचं काय झालं? हा मार्ग अद्याप का पूर्ण झालेला नाही? हा प्रश्न आहेच. याच प्रश्नांवर मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी चर्चा केली. मुंबई गोवा महामार्ग १६ वर्षे उलटूनही पूर्ण झालेला नाही. हे देखील मी गडकरींना सांगितलं. त्यावर दोन काँट्रॅक्टर पळून गेले असं मला नितीन गडकरींनी सांगितलं. तसंच इतर काही कारणंही सांगितली. त्यावर मी त्यांना म्हणालो की जनतेला या सबबी देता येत नाहीत. तुम्ही वैयक्तिकरित्या लक्ष घाला आणि हे काम पूर्ण कसं होईल ते बघा असं आपण गडकरींना सांगितल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

नितीन गडकरींनी काय म्हटलं?

राज ठाकरेंनी जी चर्चा केली त्यानंतर नितीन गडकरींनी आठवडाभरात काय करता येईल ते पाहतो आणि कळवतो असं नितीन गडकरी म्हणाल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. तसंच आपली या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा झाल्याचंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

पालघर ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेला यश मिळालं आहे. गुंदले ग्रामपंचायतीवर मनसेची सत्ता आली आहे. सातपाटी ग्रामपंचायतीच्या तीन जागावर मनसेचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. या विषयी विचारलं असता राज ठाकरे म्हणाले की जो विजय मिळाला आणि यश मिळालं त्याचा आनंद आहे. मनसेला आणखी चांगलं यश मिळेल असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

राज ठाकरे हे महाराष्ट्रातले आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. राज ठाकरे यांनी आज नितीन गडकरींशी चर्चा केली. मुंबई गोवा महामार्ग का पूर्ण झालेला नाही? याबाबत विचरणाही केली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT