सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे-राज ठाकरे

मुंबई तक

सुप्रिया सुळे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या सभेत केली आहे. आज झालेल्या भाषणात त्यांनी चौफेर टोलेबाजी केली. गुढी पाडव्याच्या सभेत जे काही राज ठाकरे बोलले होते त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली. त्या टीकेला उत्तर देण्यासाठी उत्तरसभा घेण्यात आली. या सभेत राज ठाकरेंनी घणाघाती टीका […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सुप्रिया सुळे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या सभेत केली आहे. आज झालेल्या भाषणात त्यांनी चौफेर टोलेबाजी केली. गुढी पाडव्याच्या सभेत जे काही राज ठाकरे बोलले होते त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली. त्या टीकेला उत्तर देण्यासाठी उत्तरसभा घेण्यात आली. या सभेत राज ठाकरेंनी घणाघाती टीका केली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

“शरद पवारच मोदींना भेटून रेड टाकायला सांगत असतील. मला सांगा अजित पवारांच्या घरी छापा पडतो. मात्र सुप्रिया सुळेंच्या नाही पडत. शरद पवारांना कधीही चिडलेलं पाहिलं नाही. अजित पवारांच्या घरी रेड पडली, नवाब मलिकांना अटक झाली तरीही शरद पवार आणि मोदींचे संबंध मधुर कसे? सुप्रिया सुळे यांनी काही बोलू नये सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे.”

हे वाचलं का?

    follow whatsapp