राष्ट्रवादीचे लोक गांX@## ची अवलाद, आता मनसेच्या अमेय खोपकरांची जीभ घसरली
महाराष्ट्राचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपशब्द वापरले. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याविरोधात आंदोलन करत त्यांच्या राजीनाम्याचीही मागणीही केली. हा सगळा प्रकार शमतो न शमतो तोच आता मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांची जीभ घसरली आहे. राष्ट्रवादीवर टीका करताना त्यांचा तोल ढळला […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्राचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपशब्द वापरले. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याविरोधात आंदोलन करत त्यांच्या राजीनाम्याचीही मागणीही केली. हा सगळा प्रकार शमतो न शमतो तोच आता मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांची जीभ घसरली आहे. राष्ट्रवादीवर टीका करताना त्यांचा तोल ढळला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे अमेय खोपकर यांनी?
राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक गांXX#% ची अवलाद आहेत असा शब्दप्रयोग अमेय खोपकर यांनी केला आहे. हर हर महादेव या सिनेमाचा व्हिव्हिआना मॉलमध्ये सुरू असलेला शो राष्ट्रवादी काँग्रेसने बंद पाडला. त्या ठिकाणी आलेल्या प्रेक्षकांना मारहाण केली त्यावरून ही शिवी अमेय खोपकर यांनी दिली आहे.
हर हर महादेव या सिनेमाच्या शो च्या वेळी जी घटना घडली त्या घटनेवर मनसेकडून टीका करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाडांनी बंद केलेला शो पुढच्या अर्ध्या तासात मनसे नेते अविनाश जाधव यांनी सुरु केला होता. माजी खासदार संभाजीराजे यांनी हर हर महादेव चित्रपटावर आक्षेप घेतलाय. त्यानंतर राज्यातील सर्व मराठा संघटनांकडून या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होऊ लागलीय. या सगळ्या गदारोळादरम्यान जितेंद्र आव्हाडांनी थेट चित्रपटाचा शो बंद पाडला. त्यानंतर या चित्रपटावरुन मनसे आणि राष्ट्रवादी संघर्ष बघायला मिळाला. आता अमेय खोपकरांची टीका करताना जीभ घसरल्याने या संघर्षात आणखी ठिणगी पडली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT