Mns: ‘संवेदनाहीन गुलाब…’ राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या मंत्र्याला मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

मुंबई तक

मुंबई: बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुलाब चक्रीवादळाची निर्मिती झाली. पण त्याचा परिणाम महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात झाला. कारण याच चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात तुफान पाऊस झाला. ज्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे तात्काळ नुकसान भरपाई द्या अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. ज्यावर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली होती. ज्याला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुलाब चक्रीवादळाची निर्मिती झाली. पण त्याचा परिणाम महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात झाला. कारण याच चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात तुफान पाऊस झाला. ज्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे तात्काळ नुकसान भरपाई द्या अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. ज्यावर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली होती. ज्याला आता मनसे नेते अमेय खोपकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मंत्री गुलाबराव पाटील हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांना पत्रकारांनी राज ठाकरे यांनी केलेल्या मागणीबाबत शिवसेनेची प्रतिक्रिया काय असा सवाल विचारला होता. ज्यावर गुलाबराव पाटील असं म्हणाले होते की, ‘राज ठाकरे यांनी मागणी केली हे मान्य. पण त्यांनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही. राजकारण करू नका, अशी एक प्रकारे टीकाच केली होती.

दरम्यान, याच टीकेला आता मनसे नेते अमेय खोपकर यांनी प्रत्युत्तर दिलं असून त्यांनी गुलाबराब पाटील यांची तुलना ‘गुलाब’ चक्रीवादळाशी केली आहे. संवेदनाहीन गुलाब चक्रीवादळ असं म्हणत खोपकर यांनी गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला आहे.

अमेय खोपकर यांनी ट्विटरवरुन गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली आहे. ‘गुलाब चक्रीवादळामुळं समजलं की गुलाबरावांच्या डोक्यात किती दुष्काळ आहे ते. राजसाहेब यांनी केलेली मागणी सध्याच्या परिस्थितीत अतिशय योग्य आहे, पण संवेदनाहीन ‘गुलाब’ना शेतकऱ्यांचं नुकसान कसं दिसणार? भ्रष्टाचाराचा महापूर आणि अकलेचा दुष्काळ असलेले नेते आपल्याला मिळाले हेच तर आपलं दुर्दैव आहे,’ अशा बोचऱ्या शब्दात खोपकर यांनी गुलाबराव पाटलांच्या टीकेच्या समाचार घेतला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp