Bhagat Singh Koshyari “हे पार्सल उत्तराखंडला पाठवायची वेळ आली” मनसेचा निशाणा

मुंबई तक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांच्या मुंबईविषयीच्या वक्तव्यामुळे टीकेचे धनी ठरत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पाठोपाठ आता मनसेनेही त्यांच्यावर टीका केली आहे. मनसेचे प्रवक्ते गजानान काळे यांनी उत्तराखंडचं पार्सल तिकडे परत पाठवण्याची वेळ आली असं म्हटलं आहे.तसंच संदीप देशपांडे यांनीही राज्यपालांवर खरमरीत भाषेत टीका केली. काय म्हटलं आहे मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी भगतसिंह […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांच्या मुंबईविषयीच्या वक्तव्यामुळे टीकेचे धनी ठरत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पाठोपाठ आता मनसेनेही त्यांच्यावर टीका केली आहे. मनसेचे प्रवक्ते गजानान काळे यांनी उत्तराखंडचं पार्सल तिकडे परत पाठवण्याची वेळ आली असं म्हटलं आहे.तसंच संदीप देशपांडे यांनीही राज्यपालांवर खरमरीत भाषेत टीका केली.

काय म्हटलं आहे मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी भगतसिंह कोश्यारींबाबत?

मागे सावित्रीमाई बद्दल आता मराठी,महाराष्ट्राबद्दल बेताल वक्तव्य. हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली आहे.हे खपवून घेतलं जाणार नाही असं गजानन काळे यांनी म्हटलं आहे. मराठी,महाराष्ट्राची सभ्यता,संस्कृतीचा अवमान होत असेल तर राज्यपाल या पदाचा मान,मरातब गेला चुलीत. ज्या विषयात कळत नाही तिथे चोमडेपणा करू नका असं म्हणत मनसेने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. गजानन काळे यांनी ही टीका केली आहे.

संदीप देशपांडे यांचीही राज्यपाल कोश्यारीवर टीका

मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांचीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर टीका केली आहे. ज्यांना वाटतं की आर्थिक प्रगती हीच प्रगती आहे ती त्यांची बौद्धिक दिवाळखोरी आहे. मराठी माणसाच्या त्यागामुळे मुंबई आणि महाराष्ट्र घडला आहे. मराठी माणसांमुळेच इतरांना फायदा झाला आहे. राज्यातील आधीच्या सरकारने जी धोरणं आखली त्यामुळे मुंबई, महाराष्ट्रात उद्योग आणि व्यवसाय आले. त्यामुळेच महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा प्रगत झाला आहे. महाराष्ट्राचा अपमान कधीच सहन करणार नाही. असं म्हणत संदीप देशापांडे यांनीही टीका केली आहे.