“शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणलं?” राज्यपालांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत आक्रमक
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत वक्तव्य केल्यानंतर आता त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीन ट्विट करत एकनाथ शिंदे सरकारला जाब विचारला आहे. यासाठीच शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार आणलं का? असाही प्रश्न संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे सरकारला विचारला आहे.भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. भगतसिंह […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत वक्तव्य केल्यानंतर आता त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीन ट्विट करत एकनाथ शिंदे सरकारला जाब विचारला आहे. यासाठीच शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार आणलं का? असाही प्रश्न संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे सरकारला विचारला आहे.भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
भगतसिंह कोश्यारींच्या विरोधात काय आहेत संजय राऊत यांची ट्विट?
आता तरी..ऊठ मराठ्या ऊठ..शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजपा राज्यपालांनी केला आहे.. बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत..मराठ्या तुलाच उठावे लागेल..
थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे. 105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता. मुख्यमंत्री शिंदे …ऐकताय ना. की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे..
स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा.. दिल्ली पुढे किती झुकताय?