Mobile Addicted मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, अख्खं गाव हादरलं

भागवत हिरेकर

केरळमध्ये मोबाईल वापरण्यास नकार दिल्याने मुलाने आईवर अमानुष हल्ला केला. यानंतर महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. आपल्या मुलांना मोबाईल देऊन स्वतःच्या दुनियेत व्यस्त होणाऱ्या आपल्या सर्वांसाठी ही बातमी एक इशारा आणि धडा आहे.

ADVERTISEMENT

mobile addicted boy brutally attacked on his mother, grabbed her head and slammed her against the wall, leaving the woman seriously injured.
mobile addicted boy brutally attacked on his mother, grabbed her head and slammed her against the wall, leaving the woman seriously injured.
social share
google news

Mobile Addiction in Marathi : तुमचा मुलगा किंवा तुमच्या जवळची व्यक्ती मोबाईलच्या आहारी गेलेली असेल, तर वेळीच सावध व्हा. अंमली पदार्थाप्रमाणे मोबाईलही मुलं आणि माणसांसाठी घातक ठरू लागला आहे. याचीच प्रचिती देणारी घटना समोर आली आहे. या घटनेत मुलाने आईसोबत असं काही केलं की अख्खं गाव हादरून गेलं.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्नूर जिल्ह्यातील कनिचिरा येथे राहणाऱ्या 63 वर्षीय महिला रुग्मिणी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्मिनी यांच्यावर गेल्या आठवडाभरापासून रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूचं कारण ठरलं मुलगा सुजित याला लागलेलं मोबाईलचे व्यसन.

झालं असं की, मुलगा सुजित याला मोबाईलचं व्यसन लागलं होतं. त्यावरून रुग्मिणी यांनी विचारपूस केली. इतकंच नाही, तर मोबाईलचा वापर कमी कर, असं त्या म्हणाल्या. मोबाईलचा वापर कमी करण्यास सांगितले.
यावरून मुलगा सुजितला राग आला.

सुजितने रागातच आईवर अमानुष हल्ला केला. आईचं डोके पकडून भिंतीवर आपटले. यात रुग्मिणी या गंभीर जखमी झाल्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp