Modi Government’s Cabinet Expansion: मोदी मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा संपन्न, कोणाकोणाला मिळालं मंत्रिमंडळात स्थान?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील केंद्रीय मंत्रिमंडळाचा पहिलाच विस्तार आज (7 जुलै) पार पडत आहे. राष्ट्रपती भवनात मंत्र्याचा शपथविधी सोहळा सुरु झाला आहे. पाहा कोणकोणते मंत्री शपथ घेत आहेत त्याचे LIVE अपडेट.

ADVERTISEMENT

पाहा कोणकोणत्या मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ:

1. नारायण राणे (Shri Narayan Tatu Rane) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. राणेंनी हिंदीतून घेतली शपथ.

हे वाचलं का?

2. सर्बानंद सोनोवाल (Shri Sarbananda Sonowal) – आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी इंग्रजीतून शपथ घेतली.

3. डॉ. वीरेंद्र कुमार (Dr. Virendra Kumar) – मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागलेल्या वीरेंद्र कुमार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

ADVERTISEMENT

4. ज्योतिरादित्य सिंधिया (Shri Jyotiraditya M Scindia) – मध्यप्रदेशमधील सर्वात प्रभावी नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

ADVERTISEMENT

5. रामचंद्र प्रसाद सिंह (Shri Ramchandra Prasad Singh) – बिहारमधून राज्यसभेवर गेलेले रामचंद्र प्रसाद सिंह यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.

6. अश्विनी वैष्णव (Shri Ashwini Vaishnaw) – अश्विनी वैष्णव यांनी हिंदीतून घेतली मंत्रिपदाची शपथ.

7. पशुपति कुमार पारस (Shri Pashu Pati Kumar Paras) – पशुपति कुमार पारस यांनी देखील घेतली मंत्रिपदाची शपथ

8. किरेन रिजिजु (Shri Kiren Rijiju) – किरेन रिजिजू यांचं प्रमोशन झालं आहे. क्रीडा राज्यमंत्री असलेल्या रिजिजु यांची आता कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्यामुळेच या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला.

9. राज कुमार सिंह (Shri Raj Kumar Singh) – राजकुमार सिंह यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

10. हरदीप सिंह पुरी (Shri Hardeep Singh Puri) – नागरी उड्डाण वाहतूक राज्यमंत्री असलेल्या हरदीप सिंह पुरी यांचं प्रमोशन झालं असून त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

11. मनसुख मांडविया (Shri Mansukh Mandaviya) – बंदरे विकास व जहाज राज्यमंत्री असलेल्या मनसुख मांडविया यांना राज्यमंत्रिपदावरुन कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना प्रमोशन मिळालं आहे.

12. भूपेंद्र यादव (Shri Bhupender Yadav) – 2020 बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारी होते. अमित शाह यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे. ते मुळचे राजस्थानमधील आहे.

13. पुरुषोत्तम रुपाला (Shri Parshottam Rupala) – पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात पुरुषोत्तम रुपाला यांनाही आता कॅबिनेटमध्ये स्थान देण्यात आलं आहे. ते मुळचे गुजरातचे आहेत.

14. जी किशन रेड्डी (Shri G. Kishan Reddy) – केंद्रात गृहराज्यमंत्री असलेल्या तेलंगणाच्या जी किशन रेड्डी यांचं प्रमोशन करण्यात आलं असून त्यांची कॅबिनेटपदी बढती करण्यात आली आहे. यामुळे आता त्यांना नेमकं कोणतं खातं मिळतं हे पाहणं गरजेचं आहे.

15. अनुराग सिंह ठाकूर (Shri Anurag Singh Thakur) – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री असलेल्या अनुराग ठाकूर यांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळाली आहे. कॅबिनेट मंत्रीपदी प्रमोशन झालेल्या अनुराग ठाकूर यांना कोणती जबाबदारी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

16. पंकज चौधरी (Shri Pankaj Choudhary) – पंकज चौधरी यांनी राज्यमंत्री म्हणून घेतली शपथ. ते उत्तरप्रदेशमधून खासदार म्हणून निवडून आले आहेत.

17. अनुप्रिया सिंह पटेल (Smt. Anupriya Singh Patel) – उत्तरप्रदेशमधील मिर्झापूरच्या खासदार असलेल्या अनुप्रिया सिंह पटेल यांनी राज्यमंत्रिपदाची घेतली शपथ. 2016 ते 2019 पर्यंत देखील त्या राज्यमंत्री होत्या. उत्तरप्रदेशमधील अपना दल या पक्षाच्या त्या प्रमुख आहेत.

18. सत्यपाल सिंह बघेल (Dr. Satya Pal Singh Baghel) – मंत्रिमंडळ विस्तारात सत्यपाल सिंह बघेल यांची वर्णी लागली आहे. त्यांनही घेतली मंत्रिपदाची शपथ.

19. राजीव चंद्रशेखर (Shri Rajeev Chandrasekhar) – केरळमधील उद्योजक आणि भाजपचे नेते राजीव चंद्रशेखर यांची मंत्रिमंडळात नेमणूक करण्यात आली आहे. टेक्नोलॉजी मॅन अशी त्यांची ओळख आहे

20. शोभा करंदलाजे (Sushri Shobha Karandlaje) – कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरुप्पा यांच्या विश्वासू शोभा करंदलाजे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. कर्नाटकमधील सरकारमध्येही त्या मंत्री होत्या.

21. भानु प्रताप सिंह वर्मा (Shri Bhanu Pratap Singh Verma) – भानुप्रताप सिंह यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ, ते उत्तरप्रदेशच्या जालौनमधून तब्बल पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत.

22. दर्शना विक्रम जरदोश (Smt. Darshana Vikram Jardosh) – गुजरातच्या सूरतमधून 2014 आणि 2019 साली लोकसभेवर जिंकून गेलेल्या दर्शना जरदोश यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे.

23. मीनाक्षी लेखी (Smt. Meenakashi Lekhi) – भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि खासदार असलेल्या मीनाक्षी लेखी यांची राज्यमंत्री म्हणून पंतप्रधान मोदींनी निवड केली आहे.

24. अन्नपूर्णा देवी (Smt. Annpurna Devi) – झारखंडच्या कोडामा येथील खासदार असलेल्या अन्नपूर्णा देवी यांची राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

25. ए नारायणस्वामी (Shri A. Narayanaswamy) – मंत्रिमंडळ विस्तारात कर्नाटकचे खासदार ए. नारायणस्वामी यांची देखील राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली आहे.

26. कौशल किशोर (Shri Kaushal Kishore) – उत्तरप्रदेशच्या लालगंजमधून खासदार असलेले कौशल किशोर हे संसदेच्या अनेक समित्यांमध्ये सदस्य आहेत. आता त्यांची राज्यमंत्री म्हणून देखील निवड करण्यात आली आहे.

27. अजय भट्ट (Shri Ajay Bhatt) – उत्तराखंडचे भाजपचे प्रमुख नेते असलेले अजय भट्ट यांची मोदींच्या मंत्रिमंडळात निवड करण्यात आली आहे. ते याआधी उत्तराखंड सरकारमध्ये देखील मंत्री होते.

28. बीएल वर्मा (Shri B. L. Vermaa) – उत्तरप्रदेश भाजपचे उपाध्यक्ष असलेल्या बीएल वर्मा यांना देखील मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमुळे ही निवड करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे.

29. अजय कुमार (Shri Ajay Kumar) – खासदार अजय कुमार यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

30. देऊसिंह चौहान (Shri Chauhan Devusinh) – मोदींच्या मंत्रिमंडळात देऊसिंह चौहान यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. गुजरातच्या खेडामधील ते भाजपचे प्रमुख नेते आहेत.

31. भगवंत खुबा (Shri Bhagwanth Khuba) – कर्नाटकच्या बिदरचे खासदार असलेल्या भगवंत खुबा यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.

32. कपिल मोरेश्वर पाटील (Shri Kapil Moreshwar Patil) – भिवंडीचे भाजपचे खासदार कपिल पाटील यांची देखील मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून 2014 साली भाजपमध्ये आल्यानंतर ते सलग दोनदा लोकसभेवर निवडून गेले होते. यावेळी कपिल पाटील यांनी हिंदीतून शपथ घेतली.

33. प्रतिमा भौमिक (Sushri Pratima Bhoumik) – त्रिपुरा पश्चिमच्या खासदार असलेल्या प्रतिमा भौमिक यांची राज्यमंत्री पदी वर्णी लागली आहे. विद्यार्थी दशेत असल्यापासूनच त्या भाजपमध्ये सक्रीय होत्या.

34. सुभाष सरकार (Dr. Subhas Sarkar) – प. बंगालच्या बांकुराचे खासदार असलेले सुभाष सरकार हे 2019 साली पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेले होते. त्यानंतर आता त्यांची राज्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे.

35. भागवत किसनराव कराड (Dr. Bhagwat Kishanrao Karad) – भाजपचे राज्यसभेचे खासदार भागवत कराड यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे. त्यांच्या नावाची निवड झाल्याने भाजपमधील अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

36. राजकुमार रंजन सिंह (Dr. Rajkumar Ranjan Singh) – मणिपूरच्या आंतर मणिपुरीचे खासदार असलेले राजकुमार सिंह हे 2019 साली खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. त्यांची आता राज्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे.

37. डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pravin Pawar) – नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेल्या भारती पवार यांची राज्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून ज्या चार मंत्र्यांची यावेळेश निवड करण्यात आली आहे त्यात भारती पवार यांचाही समावेश आहे.

38. विश्वेश्वर टुडू (Shri Bishweswar Tudu) – ओडिशाच्या मयूरभंजचे खासदार असलेले विश्वेश्वर टुडू यांचीही मोदी मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

39. शांतनू ठाकूर (Shri Shantanu Thakur) – प. बंगालच्या बानगांवचे खासदार असलेले शांतनू ठाकूर हे मोदींच्या मंत्रिमंडळातील तरुण मंत्री आहेत. ते 39 वर्षाचे असून आता त्यांची राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

40. डॉ. मुंजापारा महेंद्रभाई (Dr. Munjapara Mahendrabhai) – गुजरातच्या सुरेंद्रनगरचे खासदार असलेल्या डॉ. मुंजापारा महेंद्रभाई यांची राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमित शाह यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.

41. जॉन बार्ला (Shri John Barla) – प. बंगालच्या अलीपूरदास येथील खासदार असलेल्या जॉन बार्ला यांची मोदींच्या मंत्रिमंडळात निवड करण्यात आली आहे.

42. एल मुरुगन (Dr. L. Murugan) – तामिळनाडूचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या एल मुरुगन यांचीही राज्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. यानिमित्ताने भाजपने तामिळनाडूला देखील आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे.

43. निशित प्रामाणिक (Shri Nisith Pramanik) – पश्चिम बंगालच्या कूचबिहारचे खासदार असलेल्या निशित प्रामाणिक यांना देखील राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.

Cabinet Expansion : महाराष्ट्रातल्या पाच चेहऱ्यांना संधी, चार चेहरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माजी नेत्यांचे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला जातो आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या पाच चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या आधी मोठ्या घडामोडी घडल्या. कारण शपथविधी सोहळ्याच्या आधी केंद्रातील काही कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांचे राजीनामेही घेण्यात आले. यामध्ये डॉ. हर्षवर्धन, रमेश पोखरियाल निशंक अशा मोठ्या मंत्र्यांची नावं आहेत.

जवळपास दहा मंत्र्यांचे राजीनामे देण्यात आले आहेत. दरम्यान महाराष्ट्रातल्या ज्या पाच चेहऱ्यांना संधी मिळणार आहे त्यातले चार चेहरे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचे नेते आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT