Whatsapp कडून यूजर्सला पैसे, फक्त करावं लागेल छोटंसं काम
मुंबई: WhatsApp हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पेमेंटचा पर्याय देखील मिळेल. पण आता व्हॉट्सअॅपवर मेसेजिंगसोबतच तुम्हाला पैसे मिळाले तर? होय… आता या प्लॅटफॉर्मवर यूजर्सला कॅशबॅक मिळत आहे. वास्तविक, WhatsApp पेमेंट केल्यावर यूजर्सला कॅशबॅक मिळत आहे. अॅप एका व्यवहारावर 35 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. पण ही ऑफर सर्व यूजर्ससाठी […]
ADVERTISEMENT

मुंबई: WhatsApp हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पेमेंटचा पर्याय देखील मिळेल. पण आता व्हॉट्सअॅपवर मेसेजिंगसोबतच तुम्हाला पैसे मिळाले तर? होय… आता या प्लॅटफॉर्मवर यूजर्सला कॅशबॅक मिळत आहे.
वास्तविक, WhatsApp पेमेंट केल्यावर यूजर्सला कॅशबॅक मिळत आहे. अॅप एका व्यवहारावर 35 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. पण ही ऑफर सर्व यूजर्ससाठी नाही, यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतील.
WhatsApp कॅशबॅक कसा मिळवायचा?
WhatsApp पेमेंट्स वापरून पहिला व्यवहार केल्यावर तुम्हाला कॅशबॅक मिळेल. यूजर्स या ऑफरचा तीन वेळा लाभ घेऊ शकतात. यासाठी त्यांना वेगवेगळ्या यूजर्संना तीन वेळा पैसे ट्रान्सफर करावे लागतील. WhatsApp कॅशबॅक मिळवण्यासाठी यूजर्संना काही महत्त्वाच्या अटी देखील पूर्ण कराव्या लागतील.