money laundering case : अनिल देशमुखांसह तिघांविरुद्ध ED दाखल करणार आरोपपत्र
सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून अनिल देशमुख यांच्यासह त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीकडून हे आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. १०० कोटी वसुलीच्या आरोप प्रकरणात राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. अनिल देशमुख यांच्यावर […]
ADVERTISEMENT

सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून अनिल देशमुख यांच्यासह त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीकडून हे आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
१०० कोटी वसुलीच्या आरोप प्रकरणात राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. अनिल देशमुख यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार अर्थात मनी लाँडरिंग केल्याचा आरोप असून, या प्रकरणी ईडीकडून तपास केला जात आहे.
या प्रकरणात अनिल देशमुख यांच्याबरोबरच अटकेत असलेले त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे व स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे. ईडीकडून आज (२३ ऑगस्ट) हे आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे.
संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना मनी लाँडरिंग प्रकरणात २५ जून रोजी अटक केलेली आहे. खंडणीचे पैसे घेण्यात व ते अनिल देशमुख यांच्याकडे हस्तांतरित करण्यात दोघांची भूमिका होती, असं ईडीच्या तपासातून समोर आलेलं आहे.