महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजारांहून जास्त Corona रूग्णांचं निदान, 92 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजार 313 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे. तर आज दिवसभरात 92 मृत्यूंची नोंद राज्यात झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 2.12 टक्के इतका झाला आहे. तर आज राज्यात 4 हजार 360 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 62 लाख 86 हजार 345 Corona रूग्ण बरे झाले आहेत. […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजार 313 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे. तर आज दिवसभरात 92 मृत्यूंची नोंद राज्यात झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 2.12 टक्के इतका झाला आहे. तर आज राज्यात 4 हजार 360 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 62 लाख 86 हजार 345 Corona रूग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 97.4 टक्के इतके झाले आहे.
ADVERTISEMENT
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 44 लाख 87 हजार 950 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 77 हजार 987 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 98 हजार 98 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 1954 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
राज्यात आज घडीला 50 हजार 466 सक्रिय रूग्ण आहेत. राज्यात आज 4313 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 64 लाख 77 हजार 987 इतकी झाली आहे.
हे वाचलं का?
महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि सक्रिय रूग्णांची संख्या
मुंबई- 3845
ADVERTISEMENT
ठाणे-7103
ADVERTISEMENT
पुणे-14793
सातारा-6007
सांगली-3244
कोल्हापूर- 1016
सोलापूर- 2676
अहमदनगर-4937
पुण्यात सक्रिय रूग्णसंख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर ठाणे, सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये सक्रिय रूग्ण आहेत. मुंबईत 3845 सक्रिय रूग्ण आहेत. मात्र गेले सलग दोन दिवस मुंबईत चारशेहून जास्त रूग्ण आढळत आहेत त्यामुळे मुंबईकरांचीही चिंता वाढली आहे.
आज पुणे भेटीदरम्यान अजित पवार काय म्हणाले?
कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात हळूहळू ओसरू लागली आहे. तसंच अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंधही मोठ्या प्रमाणावर शिथील करण्यात आले आहेत. अशात सण आणि उत्सव आले आहेत. गणेश उत्सव तर तोंडावर येऊन ठेपला आहे. याबाबत आज अजित पवार यांनी एक इशारा दिला आहे. यंदाही सार्वजनिक गणेशोत्सवात गर्दीला आवर घालण्याची आवश्यकता आहे. घरगुती गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, त्या निर्णयाला सगळ्यांनी पाठिंबा द्यावा. मात्र रूग्णसंख्या वाढली तर कठोर निर्णय घ्यावा लागेल.
गणेशोत्सवात गर्दी वाढली तर दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय घेऊ नागरिकांनी तशी वेळ आणू नये असंही अजित पवार यांनी बजावलं आहे. अजित पवार आज कोरोनाच्या आढावा बैठकीसाठी पुण्यात होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
आणखी काय म्हणाले अजित पवार?
राज्यातल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जेव्हा होईल तेव्हा होईल मात्र तोपर्यंत शिक्षक आणि शिक्षकतेर कर्मचारी यांचं लसीकरण पूर्ण झालं पाहिजे आम्ही तसं नियोजन करतो आहोत. ग्रामीण भागांमध्ये रूग्णसंख्या जास्त आहे. पुण्यातल्या पाच तालुक्यांमध्ये रूग्ण जास्त आहेत. जिल्ह्यात पॉझिटिव्हि रेट 4 टक्के आहे. टेस्टिंग मोठ्या प्रमाणावर होऊ लागलं आहे त्यामुळेच रूग्णही अधिक आढळत आहेत असंही अजित पवार यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT