महाराष्ट्रात दिवसभरात 40 हजारांपेक्षा जास्त नवे कोरोना रूग्ण, 71 हजारांपेक्षा जास्त रूग्णांना डिस्चार्ज

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात 40 हजार 956 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर 71 हजार 966 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 45 लाख 41 हजार 391 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 87.67 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 40 हजार 956 नव्या रूग्णांचे निदान झालं आहे. तर 793 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर 1.49 टक्के एवढा झाला आहे.

Ground Report: कोरोना शहरातून गावाकडे, कोरोनाचा आता ग्रामीण भागात धुमाकूळ

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 98 लाख 48 हजार 791 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 51 लाख 79 हजार 929 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 35 लाख 91 हजार 783 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 29 हजार 955 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 5 लाख 58 हजार 996 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. आज 40 हजार 956 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 51 लाख 79 हजार 929 झाली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

18 ते 44 वयोगटातील लोकांचं लसीकरण थांबलं, याला जबाबदार कोण?

दिवसभरात नोंद झालेल्या 793 मृत्यूंपैकी 403 मृत्यू हे मागील 48 तासांमधील आहेत. तर 170 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 220 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीपूर्वीचे आहेत. हे मृत्यू नाशिक 47, नागपूर 34, बीड 22, नांदेड 22, पुणे 17, ठाणे 14, लातूर 11, जालना 10, नंदूरबार 10, अहमदनगर 5, धुळे 5, गडचिरोली 4, परभणी 4, सोलापूर 3, उस्मानाबाद 2, रत्नागिरी 2, सांगली 2, भंडारा 1, गोंदिया 1, जळगाव 1, कोल्हापूर 1, रायगड 1 आणि पालघर 1 असे आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

कोरोना रुग्णांची काळजी घेणाऱ्या केअर टेकर्सनी स्वतःला कसं सुरक्षित ठेवावं?

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि सक्रिय रूग्णांची संख्या

मुंबई – 40 हजार 162

ठाणे- 31 हजार 446

पालघर- 15 हजार 778

पुणे – 95 हजार 731

सातारा- 22 हजार 987

सांगली- 20 हजार 499

कोल्हापूर- 18 हजार 338

सोलापूर – 23 हजार 687

नाशिक – 26 हजार 806

अहमदनगर- 26 हजार 591

जळगाव- 12 हजार 905

औरंगाबाद- 10 हजार 410

बीड- 16 हजार 615

लातूर – 12 हजार 626

अमरावती- 10 हजार 801

नागपूर- 53 हजार 20

चंद्रपूर- 20 हजार 81

एकंदरीत सक्रिय रूग्णांची संख्या पाहता पुणे, नागपूर या दोन शहरांमध्ये संख्या सर्वाधिक आहे. तसंच कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्येही गेल्या तीन आठवड्यांच्या तुलनेत सक्रिय रूग्ण वाढले आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT