राज्यात २४ तासात ७ हजार ८०० पेक्षा जास्त Corona रुग्ण पॉझिटिव्ह
महाराष्ट्रात आज ७ हजार ८६३ नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ८ हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळत आहेत. मात्र सोमवारी आणि आज महाराष्ट्रात ही संख्या अल्प प्रमाणात का होईना पण कमी झाल्याचं दिसतं आहे. आज दिवसभरात ६ हजार ३३२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण २० लाख ३६ हजार ७९० […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात आज ७ हजार ८६३ नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ८ हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळत आहेत. मात्र सोमवारी आणि आज महाराष्ट्रात ही संख्या अल्प प्रमाणात का होईना पण कमी झाल्याचं दिसतं आहे. आज दिवसभरात ६ हजार ३३२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण २० लाख ३६ हजार ७९० रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट हा ९३.८९ टक्के इतका झाला आहे.
ADVERTISEMENT
पाहा मुंबई तकचा खास व्हीडिओ
आज राज्यात ५४ कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आज घडीला राज्यातील मृत्यू दर हा २.४१ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६४ लाख २१ हजार ८७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी एकूण २१ लाख ६९ हजार ३३० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ५५ हजार ७८४ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर ३ हजार ५८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
हे वाचलं का?
राज्यात आज घडीला ७९ हजार ०९३ रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत. आज राज्यात ७ हजार ८६३ नव्या रूग्णांची नोंद झाल्याने महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या २१ लाख ६९ हजार ३३० इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या ५४ मृत्यूंपैकी ३० मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर १८ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित ६ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीतले आहेत. हे सहा मृत्यू सातारा २, वर्धा २, रायगड १ आणि ठाणे १ असे आहेत. अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
प्रमुख शहरं आणि तिथल्या अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
मुंबई – ८ हजार २१७
ठाणे ८ हजार ३६६
पुणे – १५ हजार ८७२
नाशिक- २ हजार ५३४
अहमदनगर – १ हजार ४०९
जळगाव- ३ हजार ३४४
औरंगाबाद- २ हजार ४४२
अमरावती – ६ हजार ४९१
अकोला – ३ हजार ५३४
बुलढाणा- १ हजार ८५२
नागपूर- ९ हजार ९२६
अॅक्टिव्ह रूग्णांच्या दृष्टीने विचार केला तर सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आज घडीला पुण्यात आहेत. त्या खालोखाल नागपूर आणि मुंबई तसंच ठाण्यात आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क लावा, हात धुवा, सॅनिटायझरचा वापर करा असं आवाहन प्रशासनातर्फे आणि आरोग्य विभागातर्फे वारंवार करण्यात येतं आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून योग्य ती सर्व काळजी प्रत्येक नागरिकाने घ्यावी असंही आवाहन करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT