इंग्लंडहून नागपूरला आलेल्या आई आणि मुलीला कोरोना , जिनोम सिक्वेन्सिंगला पाठवण्यात आले नमुने

मुंबई तक

इंग्लंडहून नागपूरला आलेली आई आणि मुलीला कोरोना झाला आहे. त्यामुळे या दोघींना नागपूरच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दोघींची प्रकृती सध्या स्थिर आहे. या दोघींचे स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. यानंतर या दोघींना कोरोनाच्या ओमिक्रॉनची बाधा झाली आहे का? हे समजू शकणार आहे. नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 29 नोव्हेंबरला युकेहून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

इंग्लंडहून नागपूरला आलेली आई आणि मुलीला कोरोना झाला आहे. त्यामुळे या दोघींना नागपूरच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दोघींची प्रकृती सध्या स्थिर आहे. या दोघींचे स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. यानंतर या दोघींना कोरोनाच्या ओमिक्रॉनची बाधा झाली आहे का? हे समजू शकणार आहे.

नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 29 नोव्हेंबरला युकेहून प्रवास करत पती, पत्नी आणि त्यांची मुलगी हे मुंबईला आले. त्यानंतर आई-मुलगी या दोघी नागपूरला आल्या. या महिलेचं माहेर नागपूरला असल्याने ती आपल्या मुलीला घेऊन नागपूरला आली. तिचा पती मुंबईतच होता. त्याला कोरोना झाल्याची माहिती मिळाली. ज्यानंतर त्याने तातडीने आपल्या पत्नीला कळवलं. ज्यानंतर या दोघींनीही कोरोनाची चाचणी केली. ही चाचणी पॉझिटिव्ह आली. ज्याची माहिती तातडीने नागपूर महापालिकेला देण्यात आला. त्यानंतर या दोघींना एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दोघींना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे का? हे जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल आल्यानंतरच समजू शकणार आहे.

निगेटीव्ह रिपोर्ट आल्याशिवाय एअरपोर्टबाहेर प्रवेश नाही –

हे वाचलं का?