चंद्रपूर : पतीपासून वेगळं राहत असलेली मुलगी राहिली गर्भवती; आईने सुपारी देऊन केली हत्या
–विकास राजूरकर, चंद्रपूर पतीपासून वेगळं राहत असलेली मुलगी गर्भवती राहिल्याने आईनेच सुपारी देऊन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. तेलंगण-महाराष्ट्र सीमेवरील विरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. महाराष्ट्राच्या हद्दीत आणून मुलीची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आईसह दोन नातेवाईकांना अटक केली आहे. पतीपासून वेगळं राहत असतानाच मुलीला दिवस गेल्यानं आईने बदनामीच्या भीतीने […]
ADVERTISEMENT

–विकास राजूरकर, चंद्रपूर
पतीपासून वेगळं राहत असलेली मुलगी गर्भवती राहिल्याने आईनेच सुपारी देऊन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. तेलंगण-महाराष्ट्र सीमेवरील विरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. महाराष्ट्राच्या हद्दीत आणून मुलीची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आईसह दोन नातेवाईकांना अटक केली आहे.
पतीपासून वेगळं राहत असतानाच मुलीला दिवस गेल्यानं आईने बदनामीच्या भीतीने हत्या केल्याचं समोर आलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. सैदा बदावत असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. याप्रकरणी आई लचमीसह सिन्नू अजमेरा व शादरा अजमेरा या दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे.
या तिन्ही आरोपींनी सैदा बदावत हिने आत्महत्या केल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला; पण विरूर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांमध्ये गुन्ह्याचा छडा लावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सैदा बदावत ही मूळची तेलंगण राज्यातील कोंडापल्ली विजयवाडा येथील रहिवासी होती. तिचे १० वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिला ९ वर्षांची मुलगीही आहे.










