जळगाव जिल्हा बँक निवडणूक : खडसे विरुद्ध खडसे संघर्ष टळला, खासदार रक्षा खडसेंचा अर्ज बाद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधीच भाजपला जोरदार धक्का बसला आहे. भाजप खासदार रक्षा खडसे आणि विधानपरिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. यामुळेच मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघातून आता राष्ट्रवादीचे नेते आणि रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे यांची निवड बिनविरोध होणार आहे.

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रक्षा खडसे यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला होता. त्यामुळे खडसे विरुद्ध खडसे लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. परंतू रक्षा खडसेंचा अर्ज त्याआधीच बाद झाला आहे. एकनाथ खडसेंच्या सूनबाई रक्षा खडसे यांनी महिला राखीव तसेच ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर स्मिता वाघ यांनी अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून अर्ज भरला होता.

रक्षा खडसेंचा अर्ज का बाद झाला?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रक्षा खडसे यांनी मुक्ताई नगर तालुक्यातील महिला राखीव आणि इतर मागास वर्गीय मधून दोन उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र दोन्ही अर्ज हे छाननी दरम्यान बाद झाल्याने रक्षा खडसे यांचं जिल्हा बँक निवडणुकीमधून आव्हान संपुष्टात आलं आहे. रक्षा खडसे यांनी सुचका मार्फत आपले अर्ज भरले होते. नियमानुसार या अर्जावर सुचकाची सही आवश्यक असणे अनिवार्य असताना ही त्या अर्जावर नव्हती तर दुसऱ्या अर्जाचा विचार केला तर कोणत्याही सहकारी संस्थेचा दोन वर्ष सदस्य असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर एक वर्ष व्यवस्थापक असणे अनिवार्य असताना या तरतुदी रक्षा खडसे यांच्याकडून पूर्ण करण्यात आल्या नसल्याचं समोर आल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला असल्याचे समोर आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचाही एक अर्ज बाद –

ADVERTISEMENT

रक्षा खडसे यांच्या सोबतच भुसावळचे राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार संतोष चौधरी यांचा देखील उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. संतोष चौधरी यांच्या उमेदवारी अर्जावर भाजप आमदार संजय सावकारे यांनी हरकत अर्ज दाखल करताना संतोष चौधरी यांना दोन वर्षांहून अधिक काळासाठी कारागृहाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली असल्याची तक्रार केल्याने ती ग्राह्य धरण्यात आल्याने सावकारे यांचा उमेदवारी अर्ज ही बाद झाल्याने त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे.

ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा बँकेची निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी मध्यंतरी सर्वपक्षीय बैठक झाली होती. परंतू या बैठकीत काँग्रेसने भाजपसोबत जाण्यास नकार दिल्यामुळे सर्वांनी वेगवेगळे उमेदवारी अर्ज भरले होते. काँग्रेसच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीनेदेखील भाजपसोबत पॅनल करण्यास नकार दिला. बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नव्हता. काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवण्याची भूमिका मांडली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT