“पैसे खाल्ल्याचे पुरावे द्या आणि अजिंक्यतारावरून कडेलोट करा” उदयनराजेंनी कुणाला दिलं आव्हान?
सातारा महापालिकेची निवडणूक जवळ येते आहे. (Satara Municipal Election) अशात उदयनराजे यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे. उदयनराजेंचा घरचा आहेर, अशा हेडलाईन्स असतात. मी पैसे खाल्ले असते तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वां आहेत, त्यांनी मला ठेवले असते का? परंतु आपले इथले विचारवंत म्हणतात यांनी पैसे खाल्ले. आम्ही सातारा पालिकेत भ्रष्टाचार केला असेल तर समोरासमोर या, तुम्ही ठिकाण […]
ADVERTISEMENT
सातारा महापालिकेची निवडणूक जवळ येते आहे. (Satara Municipal Election) अशात उदयनराजे यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे. उदयनराजेंचा घरचा आहेर, अशा हेडलाईन्स असतात. मी पैसे खाल्ले असते तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वां आहेत, त्यांनी मला ठेवले असते का? परंतु आपले इथले विचारवंत म्हणतात यांनी पैसे खाल्ले. आम्ही सातारा पालिकेत भ्रष्टाचार केला असेल तर समोरासमोर या, तुम्ही ठिकाण निवडा आणि पुरावे द्या. तिथे जमत नसेल तर अजिंक्यतारा किल्ल्यावरील कडेलोट पॉईंटवर या. आम्ही भ्रष्टाचार केला हे सिद्ध झाले तर तेथून माझा कडेलोट करा असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
आणखी काय म्हणाले उदयनराजे?
जर आम्ही भ्रष्टाचार केला नाही हे सिद्ध झालं तर ज्यांनी आरोप केले आहेत त्यांनी त्यांचा कडेलोट अजिंक्यताऱ्यावरून करावा. मात्र आमचं चॅलेंज घ्यायला कुणी तयार नाही. असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे. उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाच हे आव्हान दिलं आहे. सातारा पालिकेच्या नूतन इमारतीच्या कामाची पहाणी केल्यानंतर उदयनराजेंनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या आरोपांना जशासतसे उत्तर दिले. खासदार उदयनराजे म्हणाले, साताऱ्याची हद्दवाढ आम्ही मार्गी लावली. हद्दवाढ झाली नसती तरी सध्याच्या पालिकेच्या इमारतीची दयनिय अवस्था होती. जनता आणि अधिकाऱ्यांत संवाद होत नव्हता. असंही उदयनराजे म्हणाले.
उदयनराजे पुढं म्हणाले, वारंवार आमच्याविरोधात आवाज उठवत भ्रष्टाचार केला म्हणत आहेत. पण, भ्रष्टाचाराचे स्पेलिंग मला माहिती नाही. तसे असते तर जे ज्येष्ठ विचारवंत जे माझ्यावर आरोप करतात, त्यांना थोडी तरी जनाची नाही मनाची तरी त्यांना वाटली पाहिजे. सत्ता असो व नसो… नगरसेवकांपासून मी सुरवात केली. त्यावेळेपासून आम्ही तळमळीने काम करत आहोत. आम्ही अनेक आंदोलने केली आमच्यावर केसेस झाल्या. पण आमच्याकडे सत्ता नसल्याने पर्याय नव्हता.
हे वाचलं का?
सातारा विकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार
उदयनराजे भोसले म्हणाले, आज मी सांगतो, साताऱ्यात आगामी निवडणुकीत सर्वच्या सर्व ५० जागांवर सातारा विकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार आहेत. उमेदवार लोकांसाठी झटणारे, काम करणारे देणार आहोत. भ्रष्टाचार त्यांच्या काळात झाला होता, आमच्या काळात झाला नाही.
दादांनी निधी दिला म्हणतात कोण दादा?
कासच्या कामासाठी हद्दवाढीतील भागासाठी प्रत्येक वेळी दादांनी पैसे दिले दादांनी पैसे दिले असे सांगत आहेत. कोण दादा…. असा प्रश्न उदयनराजे म्हणाले, तुमच्या जाहिरनाम्यात याचा उल्लेखही नव्हता. तुम्हाला श्रेय घ्यायचे असेल घ्या. चांगले झाले की श्रेय घ्यायचे आणि फोटो प्रसिद्ध करायचे, हेच त्यांचं काम आहे. श्रेय मला मिळेल म्हणून त्यावेळच्या लोकप्रतिनिधींना आम्ही सांगितले होते हे सगळं तुमच्यामुळे झालं. हद्दवाढीमुळे वाढीव भाग पालिका क्षेत्रात आला आहे. त्यांना मागेच पाणी मिळाले असतं असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT