अंबानींच्या घराबाहेर स्कॉर्पिओ प्रकरणात NIA करणार तपास
केंद्रीय गृहमंत्रालयाने मुंबईत प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ प्रकरणाचा तपास NIA कडे सोपवला आहे. महाराष्ट्र एटीएसकडून हा तपास आता NIA कडे वर्ग करण्यात येणार आहे. २५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया घराबाहेर जिलेटीनच्या कांड्या असलेली एक स्कॉर्पिओ कार आढळून आली. या गाडीत सुमारे २० जिलेटीनच्या कांड्या आणि एक धमकीचं पत्र सापडलं […]
ADVERTISEMENT
केंद्रीय गृहमंत्रालयाने मुंबईत प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ प्रकरणाचा तपास NIA कडे सोपवला आहे. महाराष्ट्र एटीएसकडून हा तपास आता NIA कडे वर्ग करण्यात येणार आहे. २५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया घराबाहेर जिलेटीनच्या कांड्या असलेली एक स्कॉर्पिओ कार आढळून आली. या गाडीत सुमारे २० जिलेटीनच्या कांड्या आणि एक धमकीचं पत्र सापडलं होतं.
ADVERTISEMENT
हिरेन मृत्यू प्रकरण : मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याची सवय सोडा !
महाराष्ट्र एटीएस या प्रकरणाचा तपास करत होती. काही दिवसांनी या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत सापडला होती. यानंतर या प्रकरणाला एक वेगळचं वळण लागलं. दरम्यान महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास NIA कडे सोपवावा अशी मागणी केली होती.
हे वाचलं का?
दरम्यान मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा महाराष्ट्र एटीएसने तपास सुरु केला असून हिरेन यांच्या पत्नीने दिलेल्या जवाबावरुन अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हिरेन यांच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी एटीएसने १० पथकं स्थापन केली असून हिरेन यांच्या मोबाईलचं लोकेशन ज्या मांडवी भागात सापडलं तिकडेही एक पथक तपास करत आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मनसुख हिरेन प्रकरण : एटीएसकडून हत्येचा गुन्हा दाखल
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT