शक्तिमान फेम मुकेश खन्ना ठणठणीत; निधनाच्या अफवांचं केलं खंडन
सध्या देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णसंख्येत देखील वाढ होतेय. काही बॉलिवूड सेलिब्रिटींना देखील कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहेत. तर अशातच अभिनेते मुकेश खन्ना यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. मात्र मुकेश खन्ना यांनी स्वतः प्रतिक्रिया देत चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मुखे खन्ना म्हणाले, “माझी […]
ADVERTISEMENT
सध्या देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णसंख्येत देखील वाढ होतेय. काही बॉलिवूड सेलिब्रिटींना देखील कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहेत. तर अशातच अभिनेते मुकेश खन्ना यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. मात्र मुकेश खन्ना यांनी स्वतः प्रतिक्रिया देत चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.
ADVERTISEMENT
एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मुखे खन्ना म्हणाले, “माझी तब्येत पूर्णपणे बरी आहे. माझ्या निधनाच्या अफवा होत्या. त्यात काहीही सत्य नाहीय. मी पूर्णपणे बरा आहे त्यामुळे अशा उठणाऱ्या अफवांवर अजिबात लक्ष देऊ नका.”
शिवाय त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हीडीयोमध्ये ते म्हणतात, “तुमच्या आशिर्वादाने मी अगदी सुरक्षित आणि निरोगी आहे. मला कोरोनाची लागण झाली नसून मी कोणत्याही रुग्णालयात उपचार घेत नाही. मला माहित नाही ही अफवा कुणी पसरवली आणि ही अफवा पसरवण्या मागचं कारण काय? अशा खोट्या बातम्या पसरवून काही जण लोकांच्या भावनांशी खेळतायत.”
हे वाचलं का?
अशा अफवा पसरवणाऱ्या लोकांवर मुकेश खन्ना यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणतात, “काही लोकांच्या अशा वागण्याने लोकांना त्रास होत असून त्यांना शिक्षा कोण देणार? आता या गोष्टी बस झाल्या. अशा खोट्या बातम्या थांबायला हव्यात.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT