मुकुल रोहतगी होणार भारताचे नवे अॅटर्नी जनरल; प्रत्येक सुनावणीला किती घेतात फी?

मुंबई तक

मुकुल रोहतगी हे देशाचे पुढील अॅटर्नी जनरल असतील. त्यांचा दुसरा कार्यकाळ 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. 2014 ते 2017 या केंद्रातील मोदी सरकारच्या पहिल्या 3 वर्षात मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल म्हणून पदभार स्वीकारला. मात्र जून 2017 मध्ये त्यांनी वैयक्तिक कारणास्तव अॅटर्नी जनरल पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी खासगी प्रॅक्टिस सुरू केली. आता केके […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुकुल रोहतगी हे देशाचे पुढील अॅटर्नी जनरल असतील. त्यांचा दुसरा कार्यकाळ 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. 2014 ते 2017 या केंद्रातील मोदी सरकारच्या पहिल्या 3 वर्षात मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल म्हणून पदभार स्वीकारला. मात्र जून 2017 मध्ये त्यांनी वैयक्तिक कारणास्तव अॅटर्नी जनरल पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी खासगी प्रॅक्टिस सुरू केली. आता केके वेणुगोपाल यांची जागा मुकुल रोहतगी घेतील.

वेणुगोपाल यांचा 30 सप्टेंबरला संपणार कार्यकाळ

वेणुगोपाल यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर रोजी संपत आहे. सरकारने पुन्हा एकदा 90 वर्षीय वेणुगोपाल यांचा कार्यकाळ वाढवण्याची ऑफर दिली होती. पण वाढत्या वयाचा आणि प्रकृतीचा हवाला देत त्यांनी ते मान्य केले नाही. 2017 मध्ये मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल पदाचा राजीनामा दिल्यानंतरच वेणुगोपाल यांनी पदभार स्वीकारला होता. आणि आता मुकुल वेणुगोपाल यांच्याकडून पदभार स्वीकारतील.

अॅटर्नी जनरल पदाचा रोहतगी यांनी 2017 साली दिला होता राजीनामा

हे वाचलं का?

    follow whatsapp