मुंबई ऑटो युनियनची महिलांसाठी ‘Touch Me Not’ विशेष मोहीम! का आहे वेगळी?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Touch Me Not Drive : आताच नाही तर अनेक वर्षांपासून महिलांची सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. महिलांच्या सुरक्षेची सर्वांनाच चिंता आहे. यासाठी अनेक मोहिमा राबवण्यात आल्या. आता मुंबई ऑटोरिक्षा युनियननेही याबाबत मोठं पाऊल उचललं आहे. ऑटोरिक्षा युनियनने महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन सुरक्षा फिचर जोडलं आहे. युनियनने महिलांच्या सुरक्षेबाबत सर्व ऑटोचालकांना संवेदनशील करण्याचा निर्णय घेतला आहे. युनियनने ‘टच मी नॉट’ मोहीम सुरू केली आहे. (Mumbai Auto Union’s Touch Me Not special campaign for women’s safety)

‘टच मी नॉट’ मोहीम आहे तरी काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील ऑटो रिक्षा युनियनने ‘टच मी नॉट’ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत रिक्षाचालकांना सांगण्यात येत आहे की, एखाद्या प्रवाशाने महिलेशी गैरवर्तन केल्यास त्यांनी त्या प्रवास करणाऱ्या व्यक्तीला रिक्षातून उतरण्यास सांगावे. प्रवासादरम्यान महिलांच्या सुरक्षिततेसाठी ऑटो रिक्षा युनियनने हे पाऊल उचललं आहे.

Nagpur Crime : सून मानसिक रुग्ण, सासूबरोबर वाद होताच, चाकूने गळाच…

महिलांना मदत करण्याचे दिले जात आहेत धडे…

युनियनचे नेते शशांक राव म्हणाले की, ‘आम्ही चालकांना अशा तक्रारी गांभीर्याने घेण्यास सांगत आहोत. अशा वेळी चालकाने रिक्षा थांबवून गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशाला रिक्षातून उतरण्यास सांगावं. महिलेला हे प्रकरण पोलिसांपर्यंत न्यायचे असेल तर रिक्षाचालकावे महिलेला जवळच्या पोलीस ठाण्यात घेऊन जावं.’ असं त्यांचं म्हणणं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Pankaja Munde : शिवशक्ती परिक्रमा यात्रा काय? पंकजा मुंडे कोणत्या जिल्ह्यात फिरणार?

महिलांची सुरक्षा हाच ‘टच मी नॉट’ मोहिमेचा मुख्य उद्देश!

युनियन सोशल मीडियाद्वारे या मोहिमेचा प्रचार करत आहे. या मोहिमेला ‘टच मी नॉट’ असं नाव देण्यात आलं आहे. रोज प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं युनियन नेत्याचं म्हणणं आहे. या मोहिमेत 80 हजार रिक्षांना कव्हर केलं जाणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT