आजपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा, मुंबईत या ठिकाणी मिळेल तुम्हाला लस

मुंबई तक

केंद्र सरकारच्या आदेशानुसार कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा आजपासून राबवण्यात येणार आहे. या टप्पात ६० वर्ष व त्यावरील आणि ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील आजारी असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार या टप्प्यात शासकीय तसेच खासगी रुग्णालयात लसीकरण राबवण्यात येणार आहे. मुंबई शहरातील जी खासगी रुग्णालयं जन आरोग्य योजना तसेच […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

केंद्र सरकारच्या आदेशानुसार कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा आजपासून राबवण्यात येणार आहे. या टप्पात ६० वर्ष व त्यावरील आणि ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील आजारी असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार या टप्प्यात शासकीय तसेच खासगी रुग्णालयात लसीकरण राबवण्यात येणार आहे. मुंबई शहरातील जी खासगी रुग्णालयं जन आरोग्य योजना तसेच केंद्र अथवा राज्य शासनाच्या आरोग्यविमा योजना राबवत असतील अशा रुग्णालयांना सदर लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे. महानगरपालिका किंवा शासकीय रुग्णालयात लसीकरण निशुल्क: असून खासगी रुग्णालयात प्रत्येक डोससाठी २५० रुपये भरावे लागणार आहेत.

अवश्य वाचा – लसीकरणात ‘या’ व्यक्तींना मिळणार प्राधान्य, सरकारकडून निकष जाहीर

केंद्र सरकारकडून मिळालेल्या सूचनेनुसार निकषांमध्ये बसणाऱ्या ५३ रुग्णालयांची यादी महापालिकेला प्राप्त झाली आहे. या रुग्णालयात शासकीय मानांकानुसार पुरेशी जागा, मनुष्यबळ तसेच लसीकरणामुळे होणारे विपरीत परिणाम, व्यवस्थापन यासाठी सुविधा आहेत की नाही या बाबींचे सर्वेक्षण करुन लसीकरण केंद्र म्हणून निवड करण्यात येईल. आजपासून मुंबईतील महानगरपालिकेच्या या ठिकाणी मोफत लसीकरणाला सुरुवात होणार आहे.

१) बी.के.सी जंबो कोविड केंद्र, बांद्रा

हे वाचलं का?

    follow whatsapp