Mumbai covid cases : मुंबईतील रुग्णसंख्या घटतेय; २४ तासांत आढळले ६,१४९ रुग्ण
ओमिक्रॉनच्या शिरकावानंतर मुंबईत अचानक कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. काही दिवस दैनंदिन २० हजारांच्या आसपास रुग्ण आढळून आल्यानं मुंबईकरांच्या चिंता वाढली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून रुग्णवाढीचा आलेख खाली येताना दिसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत मुंबईत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत […]
ADVERTISEMENT

ओमिक्रॉनच्या शिरकावानंतर मुंबईत अचानक कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. काही दिवस दैनंदिन २० हजारांच्या आसपास रुग्ण आढळून आल्यानं मुंबईकरांच्या चिंता वाढली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून रुग्णवाढीचा आलेख खाली येताना दिसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत मुंबईत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे.
मुंबईत गेल्या २४ तासांत ६ हजार १४९ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर १२ हजार ८१० रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. मुंबईतील बऱ्या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९४,८,७४४ वर पोहोचली. मुंबईचा रिकव्हरी रेट ९४ टक्के इतका आहे. सध्या मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या ४४,०८४ इतकी असून, रुग्ण दुप्पटीचा कालावधी ६१ दिवस आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट १.१० टक्के इतका आहे.
#CoronavirusUpdates
18th January, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/6Djc2IjXj8— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 18, 2022
Covid Update : कोरोनाचं संकट निवळलंय का?; ‘कोरोना पीक’बद्दल तज्ज्ञाचं भाष्य
मुंबईत 24 तासांत सात रुग्णांचा मृत्यू झाला असून, मुंबईतील एकूण कोरोना मृतांची एकूण संख्या 16,476 वर पोहोचली आहे.