वाढदिवस बेतला जीवावार! चार तरूणांचा बदलापूरजवळच्या कोंडेश्वर कुंडात बुडून मृत्यू
वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या चार मित्रांचा बदलापूरजवळच्या कोंडेश्वर कुंडात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्वयंम बाबा मांजरेकर (वय-१८) आकाश राजू झिंगा (वय-१९), सुरज मच्छिंद्र साळवे (वय-१९) आणि लिनस भास्कर उच्चपवार(वय-१९) अशी मृत्यू झालेल्या चार तरूणांची नावं आहेत. हे सगळे तरूण मुंबईतल्या घाटकोपरमधले रहिवासी होते. आकाश राजू झिंगाचा वाढदिवस आकाशचा […]
ADVERTISEMENT

वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या चार मित्रांचा बदलापूरजवळच्या कोंडेश्वर कुंडात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्वयंम बाबा मांजरेकर (वय-१८)
आकाश राजू झिंगा (वय-१९), सुरज मच्छिंद्र साळवे (वय-१९) आणि लिनस भास्कर उच्चपवार(वय-१९) अशी मृत्यू झालेल्या चार तरूणांची नावं आहेत. हे सगळे तरूण मुंबईतल्या घाटकोपरमधले रहिवासी होते.
आकाश राजू झिंगाचा वाढदिवस
आकाशचा वाढदिवस होता तो साजरा करण्यासाठी तो त्याच्या चार मित्रांसह बदलापूरजवळच्या कोंडेश्वर या ठिकाणी आला होता. पोहण्यासाठी हे चारही मित्र पाण्यात उतरले. पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही त्यामुळे ते बुडाले. या चौघांचाही बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने चारही जणांचे मृतदेह बाहेर काढले. या प्रकरणी कुळगाव पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
प्रतीक अशोक हाटे याला या चौघांच्या मृत्यूची माहिती मिळाली. जी त्याने दिली आहे. प्रतीक त्यांच्यासोबत आला नव्हता. हे चौघेजण घाटकोपरच्या कामराज नगरचे रहिवासी आहेत. आकाशचा वाढदिवस होता म्हणून तो आणि त्याच्यासह इतर तिघे असं चौघंजण कोंडेश्वर या ठिकाणी आले. पाण्यात पोहण्यासाठी उतरले. पण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने चौघेही बुडाले.
या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा त्यांनी हे मृतदेह बाहेर काढले आणि पंचनामा करण्यासाठी पाठवले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.