मुंबईसह कोकणाला उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा; हवामान विभागाकडून ऑरेंट अलर्ट
heat wave : एप्रिल सुरू होण्यास बराच अवधी असला तरी तापमानाच्या पाऱ्यात कमालीची वाढ झाली आहे. मार्चमध्ये अंगाची लाहीलाही करणारे उन्हाच्या झळांसह प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यातच आता मुंबईसह कोकणाला उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून अर्लट जारी करण्यात आला असून, काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. भारताच्या वायव्ये दिशेकडून येणाऱ्या उष्ण […]
ADVERTISEMENT
heat wave : एप्रिल सुरू होण्यास बराच अवधी असला तरी तापमानाच्या पाऱ्यात कमालीची वाढ झाली आहे. मार्चमध्ये अंगाची लाहीलाही करणारे उन्हाच्या झळांसह प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यातच आता मुंबईसह कोकणाला उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून अर्लट जारी करण्यात आला असून, काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
भारताच्या वायव्ये दिशेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यातील उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. सोमवारी (१४ मार्च) मुंबईतील तापमान ४० अंशापर्यत पोहोचले होते. तर कोकणातील रत्नागिरीत तापमानाने चाळिशी पार केली. उष्ण वाऱ्यांमुळे तापमानाचा पारा वाढल्याने उकाड्यातही प्रचंड वाढ झाली आहे.
१४ मार्च ते १६ मार्चपर्यंत राज्यातील काही भागात उष्णतेच्या तीव्र लाटेचा प्रभाव दिसणार असून, हवामान विभागाने तसा इशारा दिला आहे. मुंबई,ठाण्यासह संपूर्ण उत्तर कोकणात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. १६ मार्च रोजी संपूर्ण कोकणात उष्णतेच्या लाट असेल, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. याचबरोबर नागरिकांनी दिलेल्या सूचनांचं पालन करून काळजी घ्यावी, असं आवाहनही हवामान विभागाने केलेलं आहे.
हे वाचलं का?
राज्यातील काही शहरांत सोमवारी नोंदवले गेलेलं तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
मुंबई (३९.४), नागपूर (३७.२), पुणे (३५.८), नाशिक (३६.२), औरंगाबाद (३७.३), कोल्हापूर (३६), चंद्रपूर (३८), परभणी (३८.२), सोलापूर (३८.४), वर्धा (३८.८), रत्नागिरी (४०.२)
ADVERTISEMENT
14 व 15 मार्चला मुंबई,ठाण्यासह संपूर्ण उत्तर कोकणात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा.
14 मार्च दक्षिण कोकणात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा व 15 मार्चला उष्णतेच्या लाटेचा इशारा.
16 मार्च संपूर्ण कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा. काळजी घ्या, IMD ने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा pic.twitter.com/OTjauKHffo— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 14, 2022
काही ठिकाणी पावसाचा अंदाज
ADVERTISEMENT
मुंबई-कोकणाबरोबरच सौराष्ट्र आणि कच्छमधील काही भागातही उष्णतेची लाट असणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार देशाच्या काही भागात पाऊस होण्याचीही शक्यता आह. पश्चिम बंगाल आणि सिक्किमवर कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे. त्याचबरोबर दक्षिण छत्तीसगढ आणि जवळपासच्या भौगोलिक क्षेत्रावरही असंच क्षेत्र निर्माण झालेलं आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवरील काही भागात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT