BMC निवडणुकीत मनसेचे तिकीट देण्याचे आमिष दाखवून विभागप्रमुखाचा महिलेवर बलात्कार
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये मनसेचे तिकीट मिळवून देतो असे आमिष दाखवून एका 42 वर्षीय महिलेवर मनसेच्या विभागप्रमुखाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिडीत महिलेने केलेल्या आरोपांनुसार वृशांत वडके असे त्याचे नाव असून तो मनसेचा मलबार हिल विभागाचा प्रमुख आहे. पीडित महिलेने व्हीपी रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी वडकेविरुद्ध भादंवि कलम […]
ADVERTISEMENT

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये मनसेचे तिकीट मिळवून देतो असे आमिष दाखवून एका 42 वर्षीय महिलेवर मनसेच्या विभागप्रमुखाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिडीत महिलेने केलेल्या आरोपांनुसार वृशांत वडके असे त्याचे नाव असून तो मनसेचा मलबार हिल विभागाचा प्रमुख आहे.
पीडित महिलेने व्हीपी रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी वडकेविरुद्ध भादंवि कलम 376, 500 आणि 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी वृशांत वडकेला अटक केली असून अधिक तपास करत आहेत.
पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसेच्या वतीने तिकीट मिळवून देतो असे असं सांगत वृशांत वडके यांनी आपला गैरफायदा घेतला. त्याने सप्टेंबर 2021 ते जुलै 2022 या 10 महिन्यांच्या कालावधीत आपल्यावर अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला, असा आरोपही पिडीत महिलेने केला. वडकेवर बलात्कारासोबतच धमकावल्याचाही आरोप आहे.
दरम्यान या आरोपांनंतर वृशांत वडके यांनी विभाग प्रमुखपदाचा राजीनामा दिल्याचे एक पत्र व्हायरल होत आहे. मात्र या पत्रावरील तारीख एक आठवड्यापूर्वीची दिसून येत आहे. त्यामुळे हे पत्र खरे आहे की खोटे हे अद्याप समोर आलेले नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उद्देशुन हे पत्र लिहिण्यात आले आहे. “साहेब माझ्या काही वैयक्तिक कारणामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, कृपया तो स्विकारावा. फक्त तुमचा आणि तुमचाच वृशांत वडके” असे या पत्रात म्हटले आहे.