महाविकास आघाडीच्या ‘महामोर्चा’ला 13 अटींसह परवानगी, काय म्हटलंय आदेशात?
भाजप नेत्यांकडून महापुरूषांबद्दल करण्यात आलेली विधान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद यासह विविध मुद्द्यावरून महाविकास आघाडीने 17 डिसेंबर रोजी महामोर्चा आयोजित केला असून, मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून परवानगी देण्यात आलीये. मोर्चाला परवानगी देताना पोलिसांनी 13 अटी घातल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह भाजपच्या नेत्यांनी केलेली विधानं आणि राज्यातील इतर मुद्दे अधोरेखित करत महाविकास आघाडीने […]
ADVERTISEMENT

भाजप नेत्यांकडून महापुरूषांबद्दल करण्यात आलेली विधान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद यासह विविध मुद्द्यावरून महाविकास आघाडीने 17 डिसेंबर रोजी महामोर्चा आयोजित केला असून, मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून परवानगी देण्यात आलीये. मोर्चाला परवानगी देताना पोलिसांनी 13 अटी घातल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह भाजपच्या नेत्यांनी केलेली विधानं आणि राज्यातील इतर मुद्दे अधोरेखित करत महाविकास आघाडीने मुंबईत महामोर्चा आयोजित केला आहे. 17 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता हा मोर्चा मुंबईतील रिचर्डसन्स क्रुडास मिल पासून निघणार असून, टाइम्स ऑफ इंडियापर्यंत जाणार आहे.
महाविकास आघाडी मोर्चा : मुंबई पोलिसांनी काय घातल्या आहेत अटी?
१) रिचर्डसन्स क्रुडास मिल ते टाइम्स ऑफ इंडिया आयोजित मोर्चा शांततेने काढावा.
२) मोर्चामध्ये कुणीही प्रक्षोभक अथवा कुणाच्याही भावना दुखावतील, असे वक्तव्य करणार नाही. कुणाच्याही भावना दुखावतील असे लिखाण असलेले बोर्ड सोबत घेणार नाही किंवा घोषणा देणार नाही.