Phone Tapping : गोपनीय अहवाल फोडल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गोपनीय अहवाल फोडल्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रश्मी शुक्ला यांनी तयार केलेला अहवाल फोडण्यात आला. तसंच तो त्यातली तांत्रिक आणि इतर गोपनीय माहिती बेकायदेशीरपणे प्राप्त केली म्हणून कलम ३४० अंतर्गत भारतीय टेलिग्राफ अॅक्ट १८८५ सह माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ कलम ४३ ब, ६६ या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच द ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट १९२३ च्या कलम ५ अन्वयेही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सायबर विभाग, गुन्हे शाखा, मुंबई यांच्यातर्फे करण्यात येतो आहे.

ADVERTISEMENT

‘भाजपच्या एजंट’ असा आरोप झालेल्या रश्मी शुक्ला कोण?

रश्मी शुक्ला यांनी ऑगस्ट महिन्यात एक अहवाल तयार केला होता. या अहवालात पोलीस बदल्यांसाठीचं रॅकेट सुरू आहे आणि याप्रकरणी सीआयडी चौकशी करण्यात यावी असंही नमूद करण्यात आलं होतं. हा अहवाल त्यावेळी पोलीस महासंचालक असलेल्या सुबोध जैस्वाल यांना पाठवण्यात आला होता. त्यावेळी अतिरिक्त गृह सचिव असलेल्या सीताराम कुंटेंनाही हा अहवाल पाठवला गेला होता. या अहवालातील कव्हरिंग लेटरच्या आधारे देवेंद्र फडणवीस यांनी ती दिवसांपूर्वी काही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर हा संपूर्ण अहवाल प्रसारमाध्यमांना मिळाला.

हे वाचलं का?

Rashmi Shukla यांनी फोन टॅपिंगच्या परवानगीचा गैरवापर केला, सीताराम कुंटेंनी CM कडे सादर केला अहवाल

लिक झालेल्या अहवालानुसार त्या काळात काही फोन टॅपिंग झालं होतं असं समोर आलं. तसंच काही गंभीर आरोपही झाले होते. त्यानंतर नवाब मलिक यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि फडणवीस यांचे आरोप कसे चुकीचे आहेत हे नमूद केलं. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर कॅबिनेटची एक बैठकही झाली.

ADVERTISEMENT

या बैठकीत फोन टॅपिंगवर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी एका कारणासाठी घेतले आणि फोन टॅप केले भलत्याच लोकांचे आणि भलत्याच कारणांसाठी असा आरोपही झाला. दरम्यान गुरूवारी आता राज्याच्या मुख्य सचिव पदी असलेल्या सीताराम कुंटे यांनी एक नवा अहवाल तयार केला आणि तो मुख्यमंत्र्यांना सोपवला. या अहवालात फुटलेल्या अहवालाचा उल्लेख होता. तसंच सकृत दर्शनी असं दिसतं आहे की प्रसारमाध्यमांसमोर आलेला अहवाल आणि रश्मी शुक्ला यांनी दिलेला अहवाल हा सारखा असल्याचं दिसतंय. हा अहवाल लिक झाला असल्याचंही सीताराम कुंटेंनी त्यांच्या अहवालात नमूद केलं आहे. त्यामुळे आज मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT