Sakinaka Rape case : साकीनाका असो की पुणे, सगळ्याच घटना भयानक; फडणवीसांनी व्यक्त केली चिंता

मुंबई तक

मुंबईतील साकीनाका परिसरात एका ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार करून गुप्तांगात रॉड घालून जखमी केल्याची थरकाप उडवणारी घटना शुक्रवारी घडली. घटनेतील महिलेचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेवर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. तसेच पोलीस विभागाकडे सरकारचं लक्ष वेधलं. ‘साकीनाकात घडलेला एकूण प्रकार आणि त्यानंतर झालेला निर्भयाचा मृत्यू हा मन सुन्न करणाऱा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबईतील साकीनाका परिसरात एका ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार करून गुप्तांगात रॉड घालून जखमी केल्याची थरकाप उडवणारी घटना शुक्रवारी घडली. घटनेतील महिलेचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेवर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. तसेच पोलीस विभागाकडे सरकारचं लक्ष वेधलं.

‘साकीनाकात घडलेला एकूण प्रकार आणि त्यानंतर झालेला निर्भयाचा मृत्यू हा मन सुन्न करणाऱा आहे. चटका लावून जाणारा आहे. गेल्या महिनाभराच्या काळात बलात्काराच्या घटना घडत आहेत. याकडे लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. साकीनाक्याचा विषय असेल, अमरावतीमध्ये एका १७ वर्षाच्या मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना असेल, पुण्यात तीन घटना घडल्या. त्यात सामूहिक बलात्काराच्याही घटना आहे. पालघरमध्ये घटना घडली आहे. या सगळ्या घटना अतिशय भयानक आहेत’, अशी चिंता फडणवीस यांनी व्यक्त केली.

‘मुंबईचा लौकिक एक सुरक्षित शहर म्हणून आपण पाहत आहोत. मुंबईमध्ये रात्री-अपरात्री महिलांना, मुलींना फिरताना कधी अडचण येत नाही. पण अशा प्रकारच्या घटना घडल्या, तर मुंबईच्या लौकिकाल धक्का पोहोचतो आणि असुरक्षिततेची भावना तयार होते. हा तर निर्घृण प्रकार आहे. माणसं इतकी पाशवी कशी होऊ शकतात, असा प्रश्न पडावा; इतका भयानक आहे’, असं फडणवीस म्हणाले.

मुंबई सुन्न! बलात्कार पीडितेची मृत्युशी झुंज संपली; डॉक्टरांचे प्रयत्न ठरले अपयशी

हे वाचलं का?

    follow whatsapp