Mumbai Third Wave: ’70 टक्के लोकांना लस दिल्याशिवाय मुंबई अनलॉक करु नये’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन आठवड्यात कोरोना व्हायरसच्या तिसरी लाट (Corona Third Wave) येण्याचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. जर आपण कोव्हिड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही आणि आता ज्या पद्धतीने गर्दी करत आहोत तशीच गर्दी करत राहिलो तर तिसरी लाट लवकरच येऊ शकते. राज्यातील कोव्हिड-19 (Covid-19) टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी (Dr. Shashank Joshi) यांनी ‘मुंबई तक’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत याबाबत माहिती दिली आहे.

तसंच हे संकट कसं कमी करता येईल यासाठी देखील त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की, जोवर मुंबईतील (Mumbai) 70 टक्के लोकांना लस दिली जात नाही तोवर आपण अनलॉक करु नये. तसंच लोकल ट्रेन (Local Train) देखील सुरु करण्याचा विचार करु नये.

तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या ही दुसऱ्या लाटेतील रुग्णांच्या संख्येपेक्षा दुप्पट असणार आहे. तिसऱ्या लाटेत यावेळी अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 8 लाखापर्यंत पोहचू शकते असा अंदाज शशांक जोशी यांनी व्यक्त केला आहे. जाणून घेऊयात यावेळी त्यांनी नेमकं काय-काय म्हटलं आहे. (Mumbai should not be unlocked without vaccinating 70 percent people)

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Black Fungus: काळीज पिळवटून टाकणारी घटना… Mucormycosis मुळे मुंबईतील 3 मुलांचे काढावे लागले डोळे

प्रश्न: टास्क फोर्सचं म्हणणं आहे की, जर अनलॉक अशाच पद्धतीने सुरु राहिलं तर डेल्टा-प्लस व्हेरिएंट हे महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट आणू शकतं. आपलं याबाबत काय मत आहे?

ADVERTISEMENT

डॉ. शशांक जोशी: दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे दुसरी लाट गेली हे आणि महाराष्ट्रात परिस्थिती सुधारली आहे. दिल्ली, मुंबई आणि पुणे यासारख्या शहरांमध्ये दररोज 500 ते 600 नवे रुग्ण सापडत आहेत तरीही लोक मास्क न लावता कोव्हिड प्रोटोकॉलचे पालन न करताना पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत तिसऱ्या लाटेची शक्यता जास्त आहे.

ADVERTISEMENT

दुसरी लाट संपविण्यासाठी आपल्याल तीन गोष्टींचं पालन करावं लागेल:

1. टेस्ट पॉझिटिव्हिटी दर हा दोन आठवड्यांसाठी पाच टक्क्यांपेक्षा कमी असायला हवा.

2. 70 टक्के लोकांना लस द्यावी लागेल. याला सुमारे चार ते पाच महिने लागतील.

3. तोपर्यंत कोव्हिड प्रोटोकॉलचे उल्लंघन अजिबात होता कामा नये. मास्क लावणं हे अत्यंत गरजेचं आहे.

मुंबईत ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने बाहेरुन लोकं येत आहेत आणि कोव्हिड नियमांचं उल्लंघन करत आहेत ही गोष्ट खरंच चिंताजनक आहे. जर हे असंच सुरु राहिलं तर मात्र हे एक चिंतेचं कारण ठरु शकतं.

डेल्टा व्हेरिएंट हा किती घातक आहे हे आपण दुसऱ्या लाटेमध्ये पाहिलंच आहे. तसंच तो वेगाने पसरतो आणि लोकांना संक्रमित करतो. त्यातच आता पावसाळ्याच्या वातावरणात आणि गर्दीमुळे कोरोनाची तिसरी लाट लवकरच येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आम्ही याबाबत इशारा दिला आहे.

Vaccination for Children: कोरोनाची तिसरी लाट आणि मुलांसाठी लस… जाणून घ्या याविषयी

प्रश्न: 2020 साली महाराष्ट्रात कोरोनाची पहिली लाट आली आणि यावेळी 4 लाखांहून अधिक रुग्ण संख्या ही सर्वोच्च म्हणून नोंदवली गेली होती, दुसऱ्या लाटेतील सर्वोच्च अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 6 लाखांहून अधिक पोहचली होती. आता आपण तिसऱ्या लाटेत 8 लाख लोकं संक्रमित होतील असा अंदाज व्यक्त करत आहात. ज्यामध्ये 18 वर्षाखालील 10 टक्के मुलं संक्रमित होण्याचा धोका आहे. तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक घातक असेल?

डॉ. शशांक जोशी: याचा अंदाज गणिताच्या मॉडेल्सनुसार लावला जात आहे. आम्ही समजू शकतो की, कोरोना हा एक अंदाज न लावता येणारा असा बेभरवशाचा व्हायरस आहे. जी आकडेवारी समोर येते ती कधीही अचूक नसते. यावेळेस मध्यम वयोगटातील लोकांवर सीमित स्वरुपात परिणाम होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे लहान मुलांवर याचा जास्त परिणाम होणार नाही. परंतु 20 ते 40 वयोगटामधील लोकांना तिसऱ्या लाटेला धोका जास्त असू शकतो आणि ते निश्चित आहे.

…तर कोरोनाची तिसरी लाट फार दूर नाही ! Unlock मध्ये नागपुरात Social Distancing चा फज्जा

प्रश्नः या क्षणी मुंबई अनलॉक करणे योग्य आहे काय?

डॉ. शशांक जोशी: 70 टक्के लोकांना लस दिल्याशिवाय मुंबई अनलॉक करणं योग्य ठरणार नाही.

प्रश्न: तोपर्यंत लोकल ट्रेन सुरू करण्याचा विचार केला जाऊ नये?

डॉ. शशांक जोशी: आम्ही लोकल ट्रेन सेवा सुरू करण्याचा विचार करू शकत नाही. कारण आपण अद्यापही धोक्याच्या बाहेर नाही. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेमध्ये आपण केलेली चूक आपण पुन्हा करता कामा नये.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT