दहशतवादी मोड्युलचं मुंबई कनेक्शन, ड्रायव्हर म्हणून वावरत होता दहशतवादी समीर
पाकिस्तानच्या एका मोठ्या दहशतवादी मोड्युलचा दिल्ली पोलीस आणि युपी एटीएसने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एकाला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. मुंबईतून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव समीर असं आहे तो ड्रायव्हर म्हणून मुंबईत काम करतो ही माहिती आता समोर आली आहे. पाकिस्तानच्या ISI या अतिरेकी कारवाया […]
ADVERTISEMENT
पाकिस्तानच्या एका मोठ्या दहशतवादी मोड्युलचा दिल्ली पोलीस आणि युपी एटीएसने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एकाला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. मुंबईतून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव समीर असं आहे तो ड्रायव्हर म्हणून मुंबईत काम करतो ही माहिती आता समोर आली आहे. पाकिस्तानच्या ISI या अतिरेकी कारवाया करणाऱ्या संघटनेने या सगळ्यांना फंडिंग केलं होतं.
ADVERTISEMENT
मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड ऑपरेटिव्ह जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालियाच्या कुटुंबीयांची कसून चौकशी केली. त्यामध्ये समीर कालिया 12 सप्टेंबरपासून गायब होता आणि 14 तारखेला त्याला अटक झाली तेव्हाच ही बाब समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार समीर कालिया मुंबईहून दिल्लीला जात असताना कोटा या ठिकाणाहून त्याला अटक करण्यात आली.
समीरची पत्नी आणि मुली यांची मुंबईच्या धारावी पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू आहे. महाराष्ट्र ATS ला ही माहिती हवी आहे की समीर मुंबई किंवा महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्ये आणखी कुणाशी संपर्क ठेवून होता? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समीरच्या पत्नीने पोलिसांना सांगितलं की समीर दहशतवादी असेल असं तिला कधीही वाटलं नाही कारण समीर ड्रायव्हर म्हणून मुंबईत काम करतो. समीरला दहशतवादी म्हणून अटक झाल्यानंतर आम्हालाच आश्चर्याचा धक्का बसला आहे असं त्याच्या पत्नीने पोलिसांना सांगितलं आहे. समीर माझ्याशी कधी मोठ्या आवाजात बोलतही नाही तो दहशतवादी कारवायांमध्ये कसा सहभागी असेल? असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं असं त्याच्या पत्नीने सांगितल्यांचं पोलीस सूत्रांनी स्पष्ट केलं आहे.
हे वाचलं का?
समीर आणि त्याचं कुटुंब मुंबई सेंट्रलच्या एमजी रोड भागात असलेल्या कलाबखार भागातल्या झोपडीत वास्तव्य करतं. समीरला दोन मुली आहेत. पोलिसांनी आता समीरच्या कुटुंबीयांसोबतच त्याच्या शेजाऱ्यांचीही चौकशी सुरू केली आहे. समीर दहशवादी आहे हे समजल्यावर त्याच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनाही आश्चर्याचा धक्काच बसला आहे. मुंबई पोलिसांनी उशिरा समीर राहतो त्या भागात छापेमारीही केली मात्र त्यांच्या हाती काही लागलं नाही.
दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमने समीरला भारतल्या विविध ठिकाणी IED, शस्त्रं आणि हातबॉम्बची डिलिव्हरी करण्याचं काम दिलं होतं. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार अनिसने सणासुदीच्या काळात दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये घातपात आणि हत्या घडवून आणायच्या असा कट आखला होता. मात्र पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे त्याचे मनसुबे उधळले गेले आहेत.
ADVERTISEMENT
दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकाने मंगळवारी राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून एकूण सहा जणांना अटक केली. यामध्ये जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया, ओसामा उर्फ सामी, जीशान कमर, मोहम्मद अबू बकर, मोहम्मद आमिर जावेद, मूलचंद उर्फ साजू उर्फ लाला या सगळ्यांना अटक केली आहे. हे सगळेजण महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या ठिकाणी घातपाती कारवाया करणार होते. अटक करण्यात आलेल्या सहा जणांपैकी दोघांनी पाकिस्तानला जाऊन ट्रेनिंग घेतलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT