Mumbai Corona : मुंबईत तिसरी लाट आटोक्यात! सक्रीय रुग्णांच्या संख्येत मोठी घट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राजधानी दिल्लीत कोरोनाचा कहर सुरूच असून, आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मात्र, दिलासादायक स्थिती आहे. कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आल्यासारखीच परिस्थिती असून, दिवसागणिक दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येचा आलेखही खाली घसरू लागला आहे. मागील 24 तासांत मुंबईत 12 पेक्षाही कमी रुग्ण आढळून आले.

ADVERTISEMENT

अवघ्या महिन्याभराच्या कालावधीतच मुंबईतील कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आली आहे. मुंबईत खूप कमी संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असून, बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे मुंबईतील सक्रीय रुग्णसंख्या दहा हजारांवर आली आहे.

Covid: ‘कोरोना हा फक्त पैसा लुटण्याचा एक मार्ग आहे, मी मास्कही घालत नाही’, ‘या’ स्टारचा दावा

हे वाचलं का?

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या 24 तासांत मुंबईत 1,160 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 2,530 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनातून बऱ्या झालेल्यांची संख्या 10,15,451 वर पोहोचली आहे. तर रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे.

तिसरी लाटेला सुरूवात झाल्यानंतर मुंबईत सुरूवातीचे काही दिवस दररोज 20 हजारांच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. मात्र, महिन्याच्या मध्यावधीनंतर पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्यांची संख्या कमी झाली. यामध्ये अधेमधे कोरोना चाचण्याही खूप कमी प्रमाणात केल्या गेल्या. पाच दिवसांपूर्वी म्हणजेच 26 जानेवारी रोजी मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 22,364 इतकी होती. आज (30 जानेवारी) संख्या 10,796 इतकी आहे. पाच दिवसांत सक्रीय रुग्णसंख्या निम्म्याने घटली आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात मास्क मुक्तीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झालीच नाही; अजित पवारांचं स्पष्टीकरण

ADVERTISEMENT

मुंबईत आज (30 जानेवारी) आढळून आलेल्या कोरोना रुग्णांपैकी लक्षणं नसलेल्या रुग्णांची 1,009 आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी 160 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, 29 जणांना ऑक्सिजन बेडवर भरती करण्यात आलं आहे.

मुंबईत दिवसभरात 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या 16,612 इतकी झाली आहे. आज दिवसभरात मुंबईत 46,307 चाचण्या करण्यात आल्या. रुग्ण दुप्पटीचा कालावधी 375 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईतील सील करण्यात आलेल्या इमारतींची संख्या 8 वर आली आहे. गेल्या 24 तासांच्या कालावधीत कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 6,349 व्यक्तींचा शोध घेण्यात आला. सध्या मुंबईत एकही सक्रीय कंटेनमेंट झोन नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT