औरंगाबादच्या मौलाना आझाद महाविद्यालयाचे प्राध्यापक राजन शिंदे यांची गळा चिरून हत्या

मुंबई तक

औरंगाबादच्या मौलाना आझाद महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. राजन शिंदे यांची त्यांच्या राहत्या घरी गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. डॉ. राजन शिंदे हे मौलाना आझाद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत होते. डॉ. शिंदे हे इंग्रजी विषय शिकवत असत. त्यांचा मृतदेह आज पहाटे रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

औरंगाबादच्या मौलाना आझाद महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. राजन शिंदे यांची त्यांच्या राहत्या घरी गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. डॉ. राजन शिंदे हे मौलाना आझाद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत होते. डॉ. शिंदे हे इंग्रजी विषय शिकवत असत. त्यांचा मृतदेह आज पहाटे रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना कळवण्यात आली.

पोलीस घटना स्थळी दाखल झाले आहेत. डॉ. राजन शिंदे यांच्या घरातील कोणतीही वस्तू, पैसे किंवा दागिने चोरीला गेलेले नाहीत. त्यामुळे त्यांची हत्या का झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही.

राज्य सरकारला धक्का ! शिर्डी देवस्थान समितीला कोणतेही निर्णय घेण्यास औरंगाबाद खंडपीठाची मनाई

दरम्यान, गेल्या 24 तासात हत्येच्या दोन घटना उघडकीस आल्यामुळे औरंगाबाद शहर हादरले आहे. वाईन शॉपीवर दारु खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल रात्री उघडकीस आली होती. औरंगाबादच्या सिडको एन-8 परिसरातील विश्वास वाईन शॉपी समोर हा प्रकार घडला होता.

सिद्धार्थ रंगनाथ हिवराळे असं हत्या झालेल्या 35 वर्षीय हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. दारु विकत घेत असताना एकाने येऊन त्याच्या पोटात जोराने चाकू मारला आणि आरोपी पळून गेला असल्याची माहिती सिडको पोलिसांनी दिली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत त्या व्यक्तीला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी डीसीपी दीपक दीपक गीऱ्हे, एसीपी निशिकांत भुजबळ, पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी भेट दिली. आरोपीच्या शोध गुन्हे शाखा आणि इतर डीबी पथक घेत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp